महत्वाच्या बातम्या | यंगस्टर्स कट्टा | लव्ह & रिलेशनशिप | आर्थिक| एजुकेशन | सण - उत्सव |पर्यावरण|कौटुंबिक |बाइक्स अँड कार्स |क्लोथिंग |अप्परल्स|हॉटेलिंग | गॅजेट्स Wednesday 13-05-2026 15:01

Latest News ऑक्सफर्डच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी केले अस्पष्ट लक्षणे (जसे की थकवा किंवा वजन कमी होणे) असलेल्या रुग्णांमध्ये कर्करोग निदानाचे आतापर्यंतचे सर्वात व्यापक विश्लेषण ! संशोधनातून असे दिसून आले आहे की डॉक्टर लवकरच एआयवर अवलंबून राहू शकतात ! १० वर्षांच्या ब्लॅक होल सायन्स नंतर, स्टीफन हॉकिंग बरोबर असल्याचे सिद्ध झा मंगळावर जीवन आहे का? नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरला रोमांचक नवीन चिन्हे स नासाने म्हटले आहे की मार्स रोव्हरने गेल्या वर्षी संभाव्य बायोसिग्नेचर शोध Your Morning Coffee Could Secretly Be Weakening Antibiotics! : A Research ऑक्सफर्डच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी केले अस्पष्ट लक्षणे (जसे की थकवा कि भारतात हृदयाचा आजार बळावतोय

नवरात्रौउत्सव २०२५ : शास्त्रोक्त पद्धतीने देवीचा घट बसवण्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या...!
The Maharashtrian.com Web Team, 18-Sep-2025

Likes : 0  Views: 0 Comments 90 Share 105



नवरात्रोत्सव २२ सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. आदिशक्ती नवदुर्गेला समर्पित हा उत्सव व्रत, उपासना आणि पूजेद्वारे साजरा केला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि त्यानंतर देवीची नवरात्र सुरू होते. चला तर मग जाणून घेऊया – शास्त्रोक्त पद्धतीने देवीचा घट कसा बसवावा.

नवरात्र म्हटले की घटस्थापनेलाच विशेष महत्त्व दिले जाते. हा उत्सव देवी दुर्गेच्या नवरूपांना अर्पण केलेला असल्याने नऊ दिवस भक्तिभावाने व्रत, उपासना आणि पूजाविधी केले जातात. नवरात्रीची सुरुवात पहिल्याच दिवशी घटस्थापनेने होते. अनेकजण आपल्या घरात कुलदेवीच्या परंपरेनुसार घट बसवतात. जरी प्रत्येक घरची पद्धत वेगवेगळी असली तरी शास्त्रोक्त पूजाविधी सर्वत्र जवळपास सारखाच असतो. यंदा नवरात्रोत्सव २२ सप्टेंबरपासून सुरू होत असून, याच दिवशी घटस्थापना केली जाणार आहे. परंतु अनेकांना घटस्थापनेची योग्य पद्धत व शुभ मुहूर्त माहित नसतो. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया – नवरात्रीत घटस्थापना नेमकी कशी आणि कोणत्या वेळी करावी.

घटस्थापनेसाठी लागणारे पूजासाहित्य

घटस्थापनेसाठी फारसे जडजंबाल साहित्य लागत नाही. प्रत्येक जण आपल्या परंपरेनुसार पूजेसाठी लागणारे साहित्य कमी–जास्त करू शकतो. सर्वप्रथम ज्यामध्ये घट बसवायचा आहे ती परडी किंवा भांडे आवश्यक असते. काही जण मातीच्या भांड्यात घटस्थापना करतात, तर त्यासाठी मातीचे भांडे किंवा तांब्याचा कलश घेतला जातो.

पूजेसाठी लागणारे प्रमुख साहित्य असे –

  • विड्याची पाने

  • लाल धागा / मौली

  • सात प्रकारचे धान्य

  • तांदूळ

  • सुपारी व विडा

  • पाच फळे

  • नारळ

  • तांब्याचा कलश

  • चौरंग

  • लाल वस्त्र

  • फुले व हार

  • दिवा

  • अगरबत्ती व धूप

  • रांगोळी

 या साहित्याने शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना केली, तर नवरात्रीची सुरुवात मंगलमय आणि शुभ फलदायी होते.

 

घटस्थापनेची पद्धत – स्टेप बाय स्टेप

  1. चौरंग सजवणे

    • चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंथरावे.

    • त्यावर विड्याची पाने ठेवून देव मांडावेत.

  2. कलशाची तयारी

    • परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा/मातीचा कलश ठेवावा.

    • कलशात पाणी घालावे, त्यात नाणे आणि तांदूळ टाकावे.

    • कलशाच्या वर विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा.

    • नारळाला व कलशाला हळदकुंकू लावावे.

  3. जव/धान्य पेरणे

    • परडीत माती भरून त्यात सात प्रकारची धान्ये पेरावीत.

    • त्या मातीत कलश ठेवावा.

  4. लाल धागा व माळ तयार करणे

    • कलशाला लाल धागा (मौली) बांधावा.

    • त्या धाग्यात विड्याची नऊ पाने गुंफून माळ बनवून घटाला बांधावी.

  5. देवीची प्रतिष्ठापना

    • घट देवीसमोर बसवावा.

    • देवीला फुले, हार अर्पण करावे.

  6. पूजा व आरती

    • धूप, दीप, अगरबत्ती प्रज्वलित करावी.

    • नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी.


       

CONTACT

themaharashtrian@gmail.com
Copyright © 2017-2025 themaharashtrian.com