आपल्या पश्चात कुटुंबासाठी ‘एवढी’ संपत्ती सोडून गेला इरफान खान !

जगण्यावर प्रेम करायला शिकवणारा दिग्गज अभिनेता पद्मश्री इरफान खान यांचे मुंबईत नुक्तेच दुर्धर कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय केवळ 53 वर्ष होते. इरफानच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. इरफान याचा आपल्या कुटुंबीयांमध्ये खूप जीव होता.
इरफान याच्या कुटंबात पत्नी सुतापा सिकंदर, मुले बबिल खान, आयान खान, बहीण रुकासाना खान, भाऊ इम्रान खान आणि सलमान खान यांचा समावेश आहे. इरफान यांचा जन्म ७ जानेवारी १९६७ रोजी राजस्थानमधील टोक या गावात झाला होता. घरची परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे तो कामासाठी मुंबईमध्ये आला.
त्याला चित्रपटाची आवड असल्यामुळे नंतर त्यांनी ड्रामा स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर छोट्या पडद्यावर छोट्या-मोठ्या भूमिका त्यांना मिळाल्या. तसेच काही जाहिरातींमधून त्यांनी आपला उत्पन्नाचा स्त्रोत वाढवला. ज्यावेळी अक्षय कुमार, अजय देवगन सलमान खान, आमिर खान ही फळी मोठ्या पडद्यावर हुकूमत गाजवत होती.
त्यावेळी इरफान हा चित्रपटात येण्यासाठी स्ट्रगल करत होता. त्याच वेळी १९८८ मध्ये आलेल्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटात त्याला छोटा रोल मिळाला. या संधीचे त्याने सोने केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर इरफानने मकबूल हासिल, लाईफ इन मेट्रो, पान सिंग तोमर, तलवार, लाईफ ऑफ पाय, हिंदी मिडीयम आणि सर्वात शेवटचा म्हणजे अंग्रेजी मीडियम या चित्रपटात काम केले.
यासोबतच इरफानने जाहिरात क्षेत्रांमध्ये सुद्धा चांगले नाव कमावले होते. अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून वर आलेल्या या अभिनेत्याला श्रीमंत झाल्यावर देखील गरीबी काय असते हे चांगलेच माहीत होते. चित्रपट आणि इतर संस्थांच्या माध्यमातून त्यांनी तब्बल ३२१ कोटी रुपये कमावले. आपल्या कुटुंबीयांच्या नावे एवढी मोठी संपत्ती मागे सोडून गेला आहे.
हॉलीवूडमध्ये देखील धबधबा
इरफान खानने बॉलिवूड सोबतच हॉलीवुड या चित्रपटांमध्ये देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. यात द वॉरियर, जुरासिक वर्ल्ड, स्लमडॉग मिलेनियर, लाईफ ऑफ पाय, या आणि इतर चित्रपटात त्यांनी काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.
आगामी काळात देखील हॉलीवुडमधून त्याला विचारणा करण्यात आली होती. मात्र, आजारपणामुळे तो सध्या काम करू शकत नव्हता.