‘यावेळी’ चुकूनही पिऊ नका पाणी, शरीराला होऊ शकते गंभीर नुकसान

यात काही वादच नाही की, पाणी हे थोडक्यात आपल्यासाठी जीवनचं आहे. माणसाच्या जगण्यात मोलाचा वाटा हा पाणीच निभावतो. या जगात असं कुणीही नाही जो की, पाण्याशिवाय अधिक दिवस जिवंत राहिलं किंवा तशी कल्पनाही एखाद्याला करवणार नाही. खरतरं आजपर्यंत आपण अनेकदा पाणी पिण्याचे फायदेच ऐकत आलो आहोत.
किंवा सर्वसाधारणपणे याच गोष्टी सर्वांना ज्ञात असतात. परंतु यावेळी गोष्ट थोडीशी विपरीत आहे कारण आम्ही तुम्हाला पाणी पिण्यापासूनच्या काही नुकसानदायक बाबी सांगणार आहोत. याच कारणही तितकसं योग्य आहे. महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक किंबहुना एखाद्या गोष्टीला चुकीच्या वेळी शरीरात घेणं हे नुकसानच करणार ठरतं.
मग ते साधं पाणीदेखील असू शकतं. जर चुकून तुम्ही चुकीच्या वेळी पाण्याला शरीरात पोहोचवत असाल तर एकप्रकारे हेच पाणी विष तयार करण्याच काम करतं, होय ही अगदीच खरी गोष्ट आहे; जी आजवर आपल्याला क्वचितच माहित होती.
त्यामुळे आता इथून पुढेतरी सतर्क राहून पाण्याच्याही बाबतीत प्रत्येकाने काळजी बाळगली पाहिजे. आज या लेखात आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, पाण्याच सेवन किती प्रमाणात व कोणत्या योग्य वेळेत केलं पाहिजे. महत्वाची खबरदारी न घेता केली जाणारी गोष्ट म्हणजे, रात्रीच्या वेळी पाणी पिणे.
रात्री अधिक प्रमाणात पाणी पिल्याने शरीराच्या इतर अवयवांना त्रास उद्भवण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शक्यतो, रात्री – अपरात्री पाणी हे कमी प्रमाणात शरीरात घेतलं पाहिजे, अर्थात रात्री कमी प्रमाणात पाणी प्यावं. रात्री अधिक प्रमाणात पाणी पिल्याने त्याचा परिणाम “युरीन” अर्थात लघ्वीवरही होतो. यामुळे आपल्या किडन्यांवर दिवसेंदिवस ताण येत राहतो, पुढे चालून किडण्यांनची कार्यक्षमता यामुळे कमकुवत होण्याची दाट शक्यता वाढते.
तसं पाहिलं तर रात्रीच्या वेळी माणसाचं शरीर हे निष्क्रिय असतं. त्यामुळे आपण रात्री घेतलेल्या पाण्याचा शरीराला कुठेच उपयोग होत नाही. यासोबतच खास गोष्ट म्हणजे, जेवण केल्याच्या नंतर लगेच पाणी पिणंही घातक ठरतं.
तुम्हाला जठराग्नीबद्दल माहिती असेलचं ज्यामुळे अन्न पचनास मदत होते, जेवताना पाण्याचा सतत आत घेतल्याने जठराग्नी मंद होते, अशी गोष्ट वारंवार होत राहिल्याने अनेकांना अल्सर सारख्या इतर आजारांना सामोर जावं लागतं. त्यामुळे हेही धान्यात असू द्या, जेवल्यानंतर लगेच पाणी पिणंही घातक आहे.
बऱ्याचदा आपल्या शरीरात गेलेलं अन्न पाण्याच्या अतिरेकामुळे सडण्याचं प्रमाण वाढतं. आणि यातूनच गॅस आणि युरिक अॅसीडची निर्मिती होऊ लागते. मग पुढे चालून हे गंभिर आजारात परावर्तित होऊन आपल्याला खूप गंभिर गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे इथून पुढे पाणी पिण्याच्या वेळांबद्दल आवर्जून गांभिर्याने लक्ष द्या व आपलं व इतरांचं निरोगी जीवन समृद्ध करा.