…तर हेल्दी राहण्यासाठी तुम्ही खात असलेले काजू तुमच्यासाठी ठरतील हानीकारक

लो ब्लड प्रेशर आणि मधुमेह असलेल्यांसाठी काजू फायदेशीर. काजू खाल्ल्याने बुद्धी तल्लग होते. यामध्ये मॅग्नेशिअम असतं जे मेंदूतील रक्तप्रवाह वाढवतं. काजूचं सेवन आरोग्यासाठी चांगलं असलं तरी काही व्यक्तींसाठी ते हानीकारक ठरू शकतं, असं डॉ. शुक्ला म्हणाले. त्यामुळे व्यक्तींनी काजू बिलकुल खाऊ नयेत.
लठ्ठ व्यक्ती किंवा ज्यांच्या शरीरात फॅट जास्त आहे, त्यांनी काजू खाऊ नये. कारण काजूमध्ये फॅट जास्त असतं. एका अभ्याासनुसार 30 काजूमध्ये 163 कॅलरीज आणि 13.1 ग्रॅम फॅट असतं. ज्यांचं वजन आधीपासून वाढलेलं आहे, त्यांनी काजू खाणं टाळावं.
काजूमध्ये फॅट असल्याने ते पचायलाही जड जातात. शिवाय त्यात फायबर जास्त असतं, ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. जास्त काजू खाल्ल्याने पोटात सूजही येऊ शकते. त्यामुळे ज्यांना पोटांसंबंधी समस्या आहेत, अशा व्यक्तींनीदेखील काजू खाणं टाळावं.
मायग्रेनची समस्या असलेल्यांनीही काजू खाऊ नये. काजूमध्ये भरपूर प्रमाणात अॅसिड असतं, ज्यामुळे डोकेदुखी अधिक वाढते.
ज्यांच्या पित्ताशयात खडे आहेत, त्यांनी काजूचं सेवन टाळावं. काजूमध्ये ऑक्सलेट्समुळे त्यांना अधिक त्रास होऊ शकतो. ज्यांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असते, त्यांच्या पित्त्याशयात खडे होण्याची समस्या असते, असं सामान्यपणे सांगितलं जातं. काजूमध्ये फॅट भरपूर असतं. त्यामुळे पित्ताशयात खडे होण्याची समस्या अधिक वाढू शकते.
हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची काजू खाऊ नयेत. काजूमध्ये सोडिअम भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. अशा रुग्णांची काजूचं प्रमाणातच सेवन करावं.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काजू कसं खाता त्यानुसारही फायदा होतो. तेलात तळून काजू कधीच खाऊ नका, यामुळे काजूमधील घटक नष्ट होतात. काजू भाजून खाल्ल्याने चविष्ट लागतात आणि त्यातील घटकही कायम राहतात. याममध्ये हवं तर तुम्ही थोडं मीठ टाकू शकता.