‘या’ वस्तू त्वचेसाठी आहेत हानिकारक, वाचा सविस्तर

‘या’ वस्तू त्वचेसाठी आहेत हानिकारक, वाचा सविस्तर

आपण आपले शरीर सुंदर दिसण्यासाठी खूप खर्च करत असला तरी दिवसभरातून आपण नकळत असे काही पदार्थांचे सेवन करता ज्याने सौंदर्याला हानी पोहोचते. त्यामुळे आपले सर्व पैसे पाण्यात वाहून जातात. असे होऊ नये यासाठी आपल्याला या पेयांबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे. जे आपल्या त्वचेला हानी पोहोचवतात.

1. कॉफी : कॉफी मध्ये कॅफिन आणि साखर जास्त प्रमाणात असल्यामुळे त्वचेवर मुरूम होतात. कॉफी मध्ये असलेल्या टॅनिंग मुळे त्वचा कोरडी पडते.

2. अल्कोहल : अल्कोहल त्वचेचा ओलावा शोषून घेतो. त्वचा सैल पडू लागते. बऱ्याच कॉकटेल, डाइग्यूरस आणि मार्गरिटा मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असतं ज्यामुळे त्वचेचे नुकसान होतं.

3. सोडा आणि शीतपेय : सोडा आणि शीतपेय (कॉल्ड ड्रिंक्स) मध्ये असलेली साखर आणि अन्य घटक आपल्या आरोग्यास हानिकारक असते. सोड्याचे जास्त प्रमाण आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी करतं. शक्य असल्यास शरीरासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी सोडा घेणे टाळावे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *