या तीन कारणांमुळे आपले पोट बाहेर येते..!

अनियमित जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे प्रत्येक ऋतुत पाेट फुगते. कामाचा व्यस्त पणा घाईगडबडीच्या युगात शरिरावर लक्ष न देण. अशी अनेक पोट फुगण्याची कारण आहेत. परंतु पोट फुगण्याची इतर कारणेदेखील आहेत. ते जाणून घेऊया…
1. जास्त मीठ खाणे
आपण जे जंक फूड खोतो त्यात आणि इतर प्रकारच्या स्नॅक्समध्ये मिठाचा जास्त प्रमाणात केला जातो, त्यामुळे पोट फुगते. पोट फुगण्याचे आणखी एक कारण म्हणजे खाण्यापिण्याची चुकीची सवय, जेव्हा तेल आणि मसालेयुक्त आहार घेतला जातो तेव्हा अॅसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळेदेखील पोट फुगते.
या व्यतिरिक्त शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने किंवा पीरियडसच्यावेळी हार्मोनल बदलामुळेदेखील पोट फुगते. मुलांना जंक फुड अावडत असेल तर त्याचे प्रमाण कमी ठेवले पाहिजे, नाहीतर मोठी समस्या उद्भवू शकते.
2. जेवण केल्यावर बसून राहणे
जेवण केल्यावर बराच काळ बसून राहिल्यानेदेेखील पोट फुगत असते. त्यामुळे शक्यतो दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास फिरणे आवश्यक आहे. वेळ कमी असेल तर पायऱ्या चढा आणि उतरा. या लहान व्यायामामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. ही ऊर्जा पातळी वाढल्याने झोप येत नाही.
3. चिंता
आपला मेंदू आणि आतडे यांच्यात थेट संबंध आहे. दोघांपैकी एकामध्येही काही समस्या झाली तर एकमेकांवर परिणाम होतो. म्हणूनच, जेव्हा तुम्ही टेंशन घेता किंवा ताणतणावात राहता तेव्हा पोट फुगते. अमेरिकन कॉलेज ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीच्या मते, तणावग्रस्त लोकांना ही समस्या जास्त असते. या व्यतिरिक्त, ताण घेतल्याने पचनक्रियाचे संतुलन बिघडते आणि पोटाच्या इतर समस्या निर्माण होतात.
Excellent