‘या’ शाळेमध्ये शिकतात ‘बॉलिवूड सेलिब्रिटींची’ मुलं, फिजची रक्कम पाहूनच आवाक होऊन पडाल..!

‘या’ शाळेमध्ये शिकतात ‘बॉलिवूड सेलिब्रिटींची’ मुलं, फिजची रक्कम पाहूनच आवाक होऊन पडाल..!

आजच्या युगात पालकांना मुलांना शिक्षित करणे ही एक मोठी आणि कठीण जबाबदारी आहे. सामान्य लोक आपल्या मुलांना सरकारी शाळेत शिकवतात, पण जर एखाद्याचे चांगले उत्पन्न असेल तर तो त्याच्या मुलांना मोठ्या आणि खासगी शाळेत शिकवत असेल.

दरम्यान, सेलिब्रिटींच्या मुलांची शाळा वेगळीच असते. तसेच मुंबईत असे अनेक विद्यालय आहे जिथे अनेक अब्जाधीश आपल्या मुलांना तिथे शिकवत आहेत. लाखो रुपये डोनेशन दिल्यानंतर या शाळेत प्रवेश मिळतो. या शाळेत सेलेब्रिटी, अरबपति, राजकीय आणि व्यवसायिकांची मुलेच शिकतात.

बॉलिवूड सेलेब्रिटी म्हटलं की, त्याच्या वयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. चित्रपट नसताना बॉलिवूड सेलेब्रिटी काय करतात, रियलमध्ये कसे दिसतात. कपडे कोणते घालतात, तसेच त्यांचे मुलं काय करतात आणि कोणत्या शाळेमध्ये शिकतात? वगैरे.

बॉलिवूड मधील काही सेलेब्रिटी आहेत ज्यांचे शिक्षण मुंबई मध्येच झाले आहे म्हणून त्यांचे मुलं देखील मुंबईमध्येच शिक्षण घेत आहेत. इतकेच नाही तर त्यांची मुलेदेखील मुंबईतील प्रतिष्ठीत शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

यामध्ये शाहरूख खानचा मुलगा अबराम, अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या, माधुरी दीक्षित नेनेची दोन्ही मुले अरिन व रयान, हृतिक रोशनचे दोन्ही मुले व करिश्मा कपूरचे दोन्ही मुलांनी मुंबईतील लोकप्रिय शाळेत शिक्षण घेत आहेत.

शाहरूख खानचा मुलगा अबराम धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकतो आहे. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्यादेखील देखील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकते आहे. 2003 साली नीता अंबानीने ही शाळा सुरू केली होती.

अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव जुहूमधील इकॉले मोंडिआले वर्ल्ड स्कूलमध्ये शिकत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षयची मुलगी नितारादेखील याच शाळेत शिकत आहे.

माधुरी दीक्षित नेनेचे दोन्ही मुले अरिन व रयान मुंबईतील ऑबेरॉय इंटरनॅशनल शाळेत शिकत आहेत. ऑबेरॉय इंटरनॅशनल शाळा भारतातील टॉप तीन शाळांपैकी एक आहे.

हृतिक रोशन व सुजैनचे दोन्ही मुले धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या शाळेत बालवाडीपासून सातवी इयत्तेपर्यंतची फी 1 लाख 70 हजार इतकी आहे.

करिश्मा कपूरची दोन्ही मुलेदेखील याच शाळेत शिकत आहेत. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार शाळेची अ‍ॅडमिशन फी जवळपास २४ लाख रुपये इतकी आहे.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल या शाळेची फिस किती?

ही शाळा वर्ष 2003 मध्ये सुरू करण्यात आली होती. आणि या शाळेत सुमारे 7 मजले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार एलकेजी ते सातवी पर्यंतचे शुल्क 1 लाख 70 हजार रुपये आहे, आठवी ते दहावीसाठी (आयसीएसई बोर्ड) फी 1 लाख 85 हजार रुपये आहे.

आठवी ते दहावीसाठी (आयसीएसई बोर्ड) 4 लाख 48 हजार रुपये आहेत. शाळा आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर आयबी कोर्सवर पूर्णपणे चालते. ही शाळा मल्टीमीडिया प्रोजेक्टरकडून लेट आयटी इलेव्हन क्लासरूम आहे. या शाळेत प्रवेशासाठी आपण वेबसाइटवर दिलेल्या फोन नंबर वरून बोलू शकतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *