कोरोनाला दूर ठेवण्यासाठी ‘या’ रानभाज्या ठरतील तुमच्या आरोग्यासाठी संजीवनी..

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने अनेकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतात. अनेक तरुण किंवा तरुणींना तसेच वृद्धांना अपचनाचे आजार देखील बळावतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हलके अन्न घेणे कधीही चांगले. मात्र, अनेक लोक याकडे दुर्लक्ष करून जड अन्न घेतात. त्यामुळे पाचनाचे विकार अनेकांना जाणवतात.
त्यामुळे अनेक समस्या देखील उद्भवतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमचा जठराग्नी हा मंद झालेला असतो. त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच आपल्याला फार पूर्वीपासून काही प्रथा पाडून दिलेल्या आहेत. म्हणजे श्रावण महिन्यात मांसाहार हा अजिबात करू नये, असे म्हटले आहे.
कारण या दिवसांमध्ये रोगराई मोठ्या प्रमाणात पडलेली असते. त्यामुळे मांसाहार केल्याने अपचनाच्या तक्रारी देखील होऊ शकतात. तसेच पोटाचे विकार होऊ शकतात. यामुळेच हे आपल्याला पूर्वीपासून नियम घालून दिले आहेत. मात्र, सध्याच्या बदलत्या युगामध्ये अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करून आपली जीवनशैली बदलून विविध आहाराचे सेवन करताना दिसतात.
पालेभाज्या सेवन करणे कधीही आरोग्यासाठी चांगले असते. त्यातल्या त्यात रानभाज्या आहारात घेणे तर अतिशय उपयुक्त ठरते. मात्र, सध्या शहरी भागातील अनेकांना रानभाज्या काय असतात, याबाबत माहिती नसते. आदिवासी भागात राहणारी किंवा ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेकांना रानभाज्यांची माहिती असते. त्यामुळे ग्रामीण भागात राहणारे लोक रानभाज्यांचा पुरेपूर वापर करून आपले आरोग्य चांगले ठेवतात.
रानभाज्या खाल्ल्याने तुमच्यातील प्रतिकार क्षमताही वाढते. त्याप्रमाणे रक्ताभिसरण आणि इतर आजारांना देखील रानभाज्या दूर ठेवतात. त्यामुळे रानभाज्या याचे सेवन हे अवश्य केले पाहिजे. सध्या शहरात घोळ किंवा तत्सम भाज्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र, इतर रानभाज्या या अजिबात पाहायला मिळत नाहीत.
यंदा राज्यभरात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे राने वने चांगली फुलले आहेत. तसेच कोरोना महामारीमुळे अनेक जण घरात बसून आहेत. त्यामुळे अनेकांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे. तसेच सकस आहार घेणे देखील सध्या महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे हेरून राज्याच्या आरोग्य विभागाने अनेक ठिकाणी रानभाज्या महोत्सवाला सुरूवात केली आहे.
राज्यभरात अनेक ठिकाणी असे महोत्सव भरताना पाहायला मिळत आहेत. या महोत्सवामध्ये तांदुळजा, काठमाठ, पाथरी, तळवडा, करटोली, कुरडू, घोळ, पालक, तरवडा यासारख्या भाज्या पाहायला मिळत आहेत.या रानभाज्या यांचा उपयोग अनेक पद्धतीने आपल्याला घरच्या किचनमध्ये करता येतो. या रानभाज्या खाल्ल्याने माणसाच्या शरीरातील प्रतिकार क्षमता ही मोठ्या प्रमाणात वाढते.
तसेच त्याला अनेक आजारांपासून दूर देखील ठेवते. अनेक भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे असल्याने शरीराला या भाज्यांचा चांगला उपयोग होतो. तुमची श्वसन यंत्रणा, रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह यावर देखील या भाज्या नियंत्रण ठेवताना पाहायला मिळतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हमखास या रानभाज्याचा उपयोग करून आपली आरोग्य क्षमता वाढवावी, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
टीप : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Themaharashtrian.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.