टीम इंडियाच्या ‘या’ मराठमोळ्या क्रिकेटपटूचा शेजारी राहणाऱ्या तरुणीवर जडला होता जीव.. मात्र, कुटुंबाने टाकली होती ही अट.! तरीही केले लग्न

भारतात क्रिकेट हा खेळ म्हणजे जणू धर्मासारखाच आहे. एखादी मॅच असेल तर त्याला उत्सवासारखे पाहण्यात येते. जशी यात्रा भरते तसेच काहीसे क्रिकेटच्या बाबतीत देखील भारतात आहे. भारत- पाकिस्तान मॅच असेल तर मग बघायलाच नको. सर्व कामधंदे बंद करून लोक टीव्हीसमोर आणि स्टेडियममध्ये जाऊन मॅच पाहतात.
हल्ली भारत आणि पाकिस्तान यांच्यात फारसे सामने खेळले जात नसले तरी बाहेर देशात एखाद्या सीरिजमध्ये कधीतरी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगदार असा सामना पाहायला मिळतो. त्यावेळी चाहते अशा मॅचची वाट पाहत असतात. भारतीय क्रिकेटमध्ये आजवर अनेक क्रिकेटपटू होऊन गेले. सुनील गावस्करपासुन ते आजच्या विराट कोहलीपर्यंत अनेकांनी आपापल्या परीने भारतीय क्रिकेटला मोलाचे योगदान दिले आहे. सौरव गांगुली याने देखील खूप मोलाचे योगदान दिले आहे.
क्रिकेटमध्ये आजवर क्रिकेटपटूंच्या जास्त धावा मोजल्या जातात. तसेच त्यांचे खासगी आयुष्य देखील थोडे चर्चेत राहते. क्रिकेटपटू खासगी आयुष्यात काय करतात, काय नाही याबाबत त्यांच्या चहात्यांना खूप माहिती हवी असते. पूर्वीपासून भारतीय क्रिकेटमध्ये प्रेम प्रकरण आणि त्यांचे लग्न यावर खूप चर्चा झाल्याचे पाहायला असेल. यामध्ये सचिन तेंडुलकर याने त्याच्यापेक्षा वयाने मो ठ्या असलेल्या डॉक्टर अंजली यांच्यासोबत विवाह केला होता. त्यावेळी देखील त्याची खूप चर्चा झाली होती.
सचिन हा एक आदर्श खेळाडू आहे. त्याचे अनुकरण अनेक जण करत असतात. त्यामुळे सचिन देखील आपल्या चाहत्यांच्या विरोधात काहीही करत नाही. तसेच तडा जाईल अशी कुठलीही कृती त्याने आजवर नाही केली. सध्या टीम इंडिया मध्ये अनेक तरुण खेळाडू आहेत. विराट कोहली हा अतिशय दमदार खेळाडू आहे. त्याचे अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्यासोबत लग्न झाले आहे. तसेच इतर खेळाडू देखील खूप चर्चेत असतात. आज आम्ही आपल्याला एका मराठमोळ्या क्रिकेटपटू बद्दल सांगणार आहोत.
होय, आम्ही बोलत आहोत अजिंक्य राहणेबद्दल. अजिंक्य राहणे हा मूळचा मुंबईचा राहणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने चांगले नाव कमावले आहे. अजिंक्य रहाणे याच्या लग्नाबाबत एक रंजक गोष्ट समोर आली आहे. अजिंक्य याचे 2014 मध्ये लग्न झाले होते. अतिशय थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला होता.
या विवाह सोहळ्याला भारतीय क्रिकेटमधील अनेक क्रिकेटपटू एकत्र आले होते. अजिंक्य रहाणे याने नुकतेच एका मुलाखतीत आपल्या विवाहाविषयी रंजक माहिती दिली आहे. अजिंक्य म्हणाला की, माझ्या पत्नीचे नाव राधिका धोपावकर आहे. आम्ही मुंबईत शेजारी शेजारी राहत होतो. तसेच आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत. त्यामुळे आम्ही शाळा आणि महाविद्यालयात आम्ही एकत्र जात होतो.
सुरुवातीला आमच्यामध्ये अतिशय गाढ मैत्री होती. त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो ते कधी कळलेच नाही. आमच्या कुटुंबियांना याबाबत काहीही माहिती नव्हती. आम्ही लपून-छपून डेटवर जायचो. त्यानंतर साहजिकच आमच्या कुटुंबियांना याबाबत माहिती कळाली. त्यानंतर कुटुंबियांनी माझ्यासमोर अट ठेवली होती.
ती म्हणजे आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करियर करायचे. त्यानंतर लग्न करायचे. त्यामुळेच मी 2014 मध्ये राधीकासोबत लग्न केले. एकदा मी मित्रांसोबत राधिकाला भेटायला गेलो होतो. त्यावेळेस नियोजन करून गेलो होतो. मात्र, लग्न होणार मुलगा अशा अवतारात झाल्याने राधिका चांगली संतापली होती, असा अनुभव अजिंक्य याने एका मुलाखतीत सांगितला आहे.