कोरोनापासून वाचण्यासाठी ‘या’ पदार्थांचं सेवन नक्की करा.

कोरोनापासून वाचण्यासाठी ‘या’ पदार्थांचं सेवन नक्की करा.

कोरोना व्हायरस पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सतत हात स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पुरक आहार घेणं तितकचं महत्तवाचं आहे. ज्या व्यक्तींमध्ये रोगप्रतीकारशक्ती कमी आहे त्यांना कोरोना लवकर बळावण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचा एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, जीवनसत्त्वे सी, डी आणि बरेच सूक्ष्म पोषक घटक आहेत जे आपले कोरोनापासून संरक्षण करू शकतात. त्यामुळे या परिस्थित योग्य आहार घेणं फार गरजेचं आहे.

व्हिटॅमिन डी संक्रमणाशी लढण्यासाठी मदत करते
वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, झिंक आणि ओमेगा-३ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.

सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आहार पोषक घटकांचा समावेश आरोग्यास उपयुक्त ठरू शकतो.

दरम्यान, व्हिटॅमिन सी शरीरातील ऍन्टीबॉडीजची मात्रा वाढवण्याबरोबरच शरीरात रोगप्रतिकारक पेशी वाढवण्यास देखील मदत करतात, शिवाय व्हिटॅमिन डी संक्रमणाशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतात.

कोरोना या संक्रमाणापासून वाचण्यासाठी स्वच्छतेची काळजी अत्यंत गरजेचं आहे तितकचं योग्य, संतुलीत आहार घेणं महत्त्वाचं असल्याचं ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमधील बायोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक ऐड्रियन गोमबार्ड यांनी सांगितले आहे.

Themaharashtrian

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *