तुम्ही रोज करत असलेल्या या ‘6’ चुका ठरताय तुमचं वजन वाढण्यास कारणीभूत, वेळीच करा ‘हे’ उपाय अन्यथा…

तुम्ही रोज करत असलेल्या या ‘6’ चुका ठरताय तुमचं वजन वाढण्यास कारणीभूत, वेळीच करा ‘हे’ उपाय अन्यथा…

आपलं वजन सतत वाढत असेल तर शरीर लठ्ठ दिसू लागतं. अनेकदा आपला दिनक्रम आणि काही सवयींमुळंही वजन किंवा लठ्ठपणा वाढत असतो. परंतु याबद्दल आपल्याला जराही कल्पना नसते. या सवयी कोणत्या आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

1) झोप कमी घेणं – जर तुम्ही पूर्ण झोप घेत नसाल तर यामुळंही तुमचं वजन वाढू शकतं. कारण झोप पूर्ण घेतली नाही तर शरीरात वजन वाढवणाऱ्या हार्मोन्सचा स्तर वाढतो. यामुळं वजन वाढतं. त्यामुळं किमान 7-8 तास झोप घ्यावी.

2) एक्सरसाईज न करणं – जर व्यायाम केला नाही तर शरीरातील एक्स्ट्रा कॅलरीज तशाच वाढत राहतील आणि फॅट्सचं प्रमाण वाढून वजनही वाढेल. परंतु जर व्यायाम कराल तर तुम्ही निरोगी रहाल.

3) डाएटमध्ये प्रोटीनची कमतरता – संतुलित आहार शरीरासाठी खूप गरजेचा असतो. आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ असणं खूप गरजेचं आहे. जेवणात दूध, दही, अंडी यांचा समावेश असायलाच हवा. असं न केल्यास शरीरातील मेटाबॉलिजम स्लो होतं आणि वजन वाढू लागतं.

4) टीव्ही पाहताना खाणं – जर तुम्ही टीव्ही पहात किंवा लॅपटॉपवर काम करत खात असाल तर असं करणं बंद करा. कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे खाता तेव्हा तुम्ही ओव्हरइटींग करता. अनेकांना यावेळी जंक फूड खाण्याची सवय असते. शरीरातील फॅट्स वाढण्याचं हेही एक कारण आहे. म्हणून जेवताना फक्त जेवणाकडेच लक्ष असावं.

5) पाणी न पिणं – पाणी कमी पिल्यानं शरीरातील नको असलेले किंवा विषारी पदार्थ बाहेर टाकणं शक्य होत नाही. यामुळं मेटाबॉलिजम स्लो होतं आणि वजन वाढतं.

6) नाष्ता स्किप करणं – नाष्ता स्किप केला तर बॉडीचा मेटाबॉलिजम रेट कमी होतो. याशिवाय फॅट बर्निंगची प्रोसेसही स्लो होते. म्हणून सकाळच्या वेळी हेल्दी नाष्ता करा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *