‘या’ सात व्हिटामिनची कमी असल्यास पुरुषांना येते कमजोरी.. वाचा सविस्तर

‘या’ सात व्हिटामिनची कमी असल्यास पुरुषांना येते कमजोरी.. वाचा सविस्तर

पूर्वीच्या पुरुषांमध्ये प्रतिकारशक्ती प्रचंड असे. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेक पुरुषांना प्रतिकार शक्ती आणि इतर समस्यांचा सामना करावा लागतो. सध्या तर कोरोना महामारीच्या अनुषंगाने विटॅमिन असणे तर फार आवश्यक आहे. पुरुषांना दररोज आवश्यक असे सात व्हिटॅमिन्स लागत असतात. या लेखात आपण आवश्यक असणारे व्हिटामिन्स जाणून घेऊया.

१. व्हिटॅमिन डी : हे व्हिटामिन पुरुषांमध्ये वाढत्या वयाचा प्रभाव कमी करते. मेंदू आणि हृदय विकारापासून आजारापासून बचाव करते. शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यासाठी आवश्यक दररोज 600 ग्राम नियमित हे व्हिटामिन गरजेचे असते. हे व्हिटामिन मिळविण्यासाठी सूर्यकिरणे उत्तम स्त्रोत आहे. मासे आणि दुग्धजन्य पदार्थासून व्हिटॅमिन मिळते. पनीर खावे.

२. कॅल्शियम :
पुरुषांची हाडे स्नायू नस आणि हृदयाचे कार्य समान ठेवण्यासाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक असते. रोज पुरुषांना कॅल्शिअमची गरज असते. जवळपास १हजार मिलीग्राम नियमित कॅल्शियम लागते. दूध, दुग्धजन्य पदार्थ, बदाम, सोयाबीन, संत्री, मासे यापासून कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळते. याचे सेवन रोज करावे.

३ व्हिटॅमिन बी 12: रक्त आणि मेंदूचे कार्य सामान्य ठेवण्यासाठी गरजेचे आहे. यामुळे पचनक्रिया चांगली सुधारते. दररोज जवळपास 204 मिली ग्राम b12 शरीराला आवश्यक असते. मास, चिकन, दूध, दही, पनीर तस्तम पदार्थापासून विटामिन बी12 आपल्याला मिळते. याचे सेवन अवश्य करावे.

४. मॅग्नेशियम : हे घेतल्यास उच्च रक्तदाबाची समस्या दूर होऊ शकते. हृदयविकार कमी करते. मॅग्नेशियम शोषून घेण्यास मदत होते. दररोज जवळपास 320 मिलीग्राम नियमित घेणे आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन यापासून मॅग्नेशियम आपल्या शरीराला मिळते.

५. विटॅमिन बी 6: यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहते. आजारापासून बचाव होतो. लाल रक्तपेशींची संख्या वाढण्यास मदत होते. फंक्शन चांगले ठेवते. रोज 1.3 मिलीग्राम नियमित विटामिन बी 6 गरजेचे असते. बीट, अंडी, मासे, हॉल ग्रेन मास, बटाटे यापासून हे विटामिन मिळते.

६. व्हिटॅमिन के : हे व्हिटॅमिन ब्लड क्लॉटिंग मध्ये मदत करून अंतर्गत आणि बाहेरही ब्लडिंग होऊ देत नाही. हाडांमध्ये कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. दररोज 122 ते 138 मायक्रो ग्रॅम नियमित घ्यावे. पालक, ब्रोकली अशा हिरव्या भाज्या सोयाबीन तेल यामधून विटामिन के मिळते.

७. व्हिटॅमिन ए : डोळ्यांना निरोगी ठेवते. दृष्टी लवकर कमजोर होत नाही. हाडे मजबूत राहतात आणि आजारापासून बचाव करण्यास मदत करते. दररोज जरूर 700 ते 900 ग्राम नियमित यांचे सेवन करावे. दूध दुग्धजन्य पदार्थ, रताळी, ब्रोकली यापासून हे विटामिन मिळते

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *