काय सांगता ! मिस वर्ल्ड असलेल्या ‘या’ मॉडेलने 13 कोटी खर्चून काढलाय शरीराच्या ‘या’ भागाचा विमा !

काय सांगता ! मिस वर्ल्ड असलेल्या ‘या’ मॉडेलने 13 कोटी खर्चून काढलाय शरीराच्या ‘या’ भागाचा विमा !

विमा म्हणजेच इंश्युरन्स. आपल्यापैकी जवळपास सर्वच जण आपल्या आयुष्याचा विमा काढत असतात. आयुष्याची कोणतीही शाश्वती नाही. कधी काय होईल हे सांगूच शकत नाही, म्हणून सर्वचजन आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी विमा काढतच असतात. त्याचबरोबर आपल्या गाडीचा देखील विमा अनेकजण काढतात.

माघील काही वर्षांपासून मात्र, अनेकजण वेगवेगळ्या, अजबच गोष्टींचा विमा काढत असल्याचे आपण पहिले आहे. सेलिब्रटीज केवळ आपल्या आयुष्याचा, घराचा आणि गाडीचाच नाही तर अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा विमा काढत आहेत. प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत व अमिताभ बच्चन, जगातील सर्वोत्तम गायिका लता मंगेशकर यांनी आपल्या आवजाचा विमा काढलेला आहे.

मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा व हॉलीवूडची अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स यांनी आपल्या स्माईल म्हणजेच स्मितहास्याचा विमा काढलेला आहे. भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने आपल्या हातांचा विमा काढला आहे तर, ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदरने आपल्या बोटांचा विमा काढला आहे.

म’र्ड’र सिनेमातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मल्लिका शेरावतने आपल्या संपूर्ण शरीराचा विमा काढला आहे. कॉमेडी नाईट्स विथ कपिल मध्ये जेव्हा जॉन अब्राहम आला होता, त्यावेळी कपिलने त्याला विचारले होत,’खरोखर तुम्ही तुमच्या पृष्ठभागाचे म्हणजेच बटचे इंश्युरन्स केले आहे का?’ त्यावर जॉनने होकार देत, त्याच्यासाठी ते किती महत्वाचं होत असं सांगितलं होत.

जॉन अब्राहमचे अनुकरण करत, अभिनेत्री मिनिषा लांबा आणि नेहा धुपिया यांनी देखील आपल्या बटचे इंश्युरन्स केलं आले. त्यांचेच अनुकरण करत आता अजून एका सेलेब्रिटीने १३ कोटी खर्च करत आपल्या पृष्ठभागाचा म्हणजेच बटचा विमा काढला आहे. ३५ वर्षीय मॉडेल नथी किहाराने अलीकडेच मिस बट वर्ल्ड २०२१ जिंकली आहे.

इंस्टाग्रामवरील अनेक स्पर्धकांपैकी, नथी किहाराला सर्वाधिक पसंती अर्थात मतं मिळाली आणि त्यामुळे किहाराची ‘मिस बट वर्ल्ड’ म्हणून निवड करण्यात आली. हे विजेतेपद जिंकल्यानंतर, नथी किहाराने चक्क आपल्या बटचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तिने १.३ मिलियन पौंड म्हणजेच १२ कोटी ९५ लाख रुपये खर्च केले आहेत.

थोडक्यात, किहाराने तब्ब्ल १३ कोटी रुपये देऊन तिच्या एका अवयवाचा विमा उतरवला आहे. याबद्दल बोलताना नथी म्हणते की, ‘मी माझ्या बटामुळे प्रसिद्ध आहे. मी विजेतेपदही जिंकले आहे. त्यामुळेच मी इतके पैसे खरंच करून माझ्या सुंदर बटचा विमा काढला आहे. पण मला असं वाटतं की, माझे बट अजून जास्त आकर्षक आणि सुंदर बनू शकतात.

त्यामुळे अजून जास्त व्यायाम करून मी त्यांना अजून सुंदर करू इच्छिते.त्यासाठी मी माझ्या रोजच्या व्यायामात अनेक बदल केले आहेत. खास ट्रेनर कडून मी काही नवीन व्यायाम प्रकार शिकत आहे.’ नथी किहारा ब्राझीलची असून, जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या एका-एका फोटोवर, लाखोने लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *