विशेष बनले अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे इंस्टाग्राम अकाऊंट… ‘हे’ आहे कारण

आज कालच्या जमान्यामध्ये कुठल्याही क्षेत्रात काम करायचं म्हणजे त्या व्यक्तीला आवश्यक प्रसिद्धीही मिळवावी लागते. मग यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असो की राजकीय कार्यकर्ते. सेलिब्रिटी असो क्रिकेटर असो किंवा आणखी कोणी असो. ते समाज माध्यमांचा आधार घेऊन आपली प्रसिद्धी करण्यातच मश्गुल असल्याचे पहायला मिळते.
मात्र, काही असे कार्यकर्ते आहेत की जे समाज माध्यमांचा वापर फार कमी प्रमाणात करून समाजसेवा करत असतात. त्यामध्ये काही लोकांचेच नाव घ्यावे लागतील. सचिन तेंडुलकरपासून अमिताभ बच्चनपर्यंत अनेक सेलिब्रिटी हे सोशल मीडियाचा वापर करतात. सुरुवातीला सर्व सेलिब्रिटी हे प्रामुख्याने ट्विटर या सोशल माध्यमाचा वापर करायचे. त्यानंतर हळूहळू त्यांनी आपला फेसबुककडे देखील मोर्चा वळवला.
याआधी अनेक कलाकार फेसबुकचा जास्त वापर करत नव्हते. मात्र, कालांतराने त्यांनी देखील फेसबुकचा वापर सुरू करण्यास सुरुवात केली. अमिताभ बच्चन काही वर्ष फेसबुकवर अकाऊंट नव्हते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेक अभिनेत्यांनी फेसबुकवर अकाऊंट उघडले आहे. याशिवाय अनेक अभिनेत्यांचे इंस्टाग्रामवर देखील खाते असते.
इंस्टाग्रामवर ते आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात. विशेष म्हणजे इंस्टाग्राम वर तुमचे जेवढे फॉलॉवर असतील तेवढी तुमची कमाई देखील होत असते. इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी लाखो रुपये अभिनेते व सेलिब्रिटींना मिळत असतात. मात्र, सर्वसामान्य यांना त्याचा काही फायदा होत नसतो. ते केवळ अभिनेते किंवा सेलिब्रिटीचे फोटो यावर पाहू शकतात.काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत हादेखील जग सोडून गेला आहे.
गेल्या काही महिन्यात अनेक अभिनेत्यांचे निधन झाले आहे. ऋषी कपूर, इरफान खान यांनी हे जग सोडून गेले आहेत. त्यानंतर महिन्याभरातच जवळपास अकरा सेलिबेटी या जगातून निघून गेल्याचे आपण पाहिले असेल. त्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये सुशांत सिंह राजपूत यांचे देखील निधन झाले.त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत. सुशांत सिंह राजपूत याला कोणी आत्महत्येस प्रवृत्त केले का? याचा देखील शोध घेण्यात येत आहे. याचा शोध लागेल तेव्हा लागेल.
मात्र, त्याच याबाबतच्या अनेक गोष्टींचा खुलासा देखील होत आहे. सुशांत सिंह राजपूत इंस्टाग्राम अकाउंट वापरत होता. इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे जवळपास एक कोटी वीस लाख फॉलोअर्स होते. तसेच तो 6737 लोकांना फॉलो देखील करायचा. सुशांत सिंह राजपूत असा एकमेव अभिनेता होता की तो आपल्या चाहत्यांना देखील फॉलो करायचा. यासाठी त्याला काही लाखांमध्ये रक्कम देखील मिळायची.
मात्र, काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूत गेल्यानंतर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अचानक एक पोस्ट आली. ही पोस्ट खुद्द इंस्टाग्रामकडूनच अपलोड करण्यात आली आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेमोरियल पोस्ट टाकण्यात आली आहे. म्हणजे इंस्टाग्राम पॉलिसीनुसार जे लोक या जगातून जातात त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असे लिहिले जाण्याची पद्धत पॉलिसी नुसार आहे.
म्हणजे त्याच्या अकाउंटवर आता मेमोरियल असणार आहे. त्याच्या अकाउंटला कोणीही छेडछाड करू शकणार नाही. तसेच त्यांनी यापूर्वी केलेल्या पोस्टच्या जशाच्य तशा पाहायला मिळतात. त्यानंतर त्याच्या अकाउंटच्या पुढे रेमेंबरिंग असे देखील नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता त्याचे अकाउंट एक ऐतिहासिक दस्तावेज झाल्याचे म्हणावे लागेल.