जर २ वेगवेगळ्या लशीचे डोस घेतले तर आपल्या श’रीरावर काय परिणाम होऊ शकतो ? तज्ञ काय सांगतात…!

को’रोना प्रतिबंधक लशींचा तु’टवडा भारतात तर जाणवतोच आहे. पण तो जगभरात अनेक देशांमध्येही आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या लशींचे डो’सेस देऊन या तुटवड्यावर मात करता येईल का, यादृष्टीने विचार सुरू झाला आहे. पण पहिला डो’स एका कंपनीच्या लशीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या कंपनीच्या लशीचा अशा पद्धतीने डोस घेतले तर त्याचा काही प’रिणाम होतो का? असा प्रश्न साहजिकच पडतो.
ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या संशोधकांनी हा प्रयोग केला. ज्याचा निष्कर्ष लँसेट या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. को’रोना लशीचेे दोन वेगवेगळे डो’स घेणाऱ्या व्यक्तींना थ’कवा, डो’केदु’खी असे सा’इड-इ’फेक्ट्स जाणवतात, असं संशोधनातून लक्षात आलं आहे. ब्लूमबर्गने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
प्रयोगादरम्यान काही व्यक्तींना अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या लशीचा पहिला डोस देण्यात आला, तर चार आठवड्यांनंतर दुसऱ्या डोसवेळी त्यांना फायझर कंपनीची लस देण्यात आली. या व्यक्तींना थोड्या कालावधीसाठी सौम्य स्वरूपाचे साइड-इफेक्ट्स जाणवले. या लशींचा क्रम उलटा केला, तरी तसेच साइड-इफेक्ट्स जाणवल्याचं संशोधकांनी नमूद केलं आहे.
हे Explainer : लशीचा पहिला डो’स घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डो’स कधी घ्यावा?
ऑक्सफर्ड विद्यापीठातले लसीकरण या विषयातले प्राध्यापक मॅथ्यू स्नेप यांनी सांगितलं, ‘आम्हाला या प्रयोगातून अपेक्षित असलेले निष्कर्ष मिळालेले नाहीत. दोन डोस वेगवेगळ्या लशींचे दिल्यास प्रतिकारशक्ती विकसित होण्यास हातभार लागेल का, याबद्दल आम्हाला अद्याप माहिती नाही. आणखी काही आठवड्यांत आम्ही निष्कर्ष काढू.’
फ्रान्समध्ये अॅस्ट्राझेनेका कंपनीची लस आता केवळ ज्येष्ठांपुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहे. मात्र सरकारने तसा नियम करण्यापूर्वी अनेकांनी ती लस घेतली होती. त्या व्यक्तींना आता फायझर-बायोएनटेक या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशी दुसऱ्या डोससाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
हे डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाला कोरोना लशीचं कवच; मोदी सरकारने तयार केला हा प्लॅन
भारतात केंद्र सरकारने एक मेपासून 18 वर्षांवरच्या सर्वांनाच लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र लसीकरण कार्यक्रमाचा वेग जवळपास 50 टक्क्यांनी घटल्याचं सरकारी आकडेवारीवरून दिसून येत आहे.
को-विन प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, एक मे ते सहा मे या कालावधीत 11.6 दशलक्ष डोस दिले गेले. तीन एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत 24.7 दशलक्ष डोस दिले गेले होते. गेल्या आठ आठवड्यांच्या तुलनेत गेल्या आठवड्यात देण्यात आलेल्या डोसची संख्या सर्वांत कमी आहे. त्यामुळे एक मेनंतर 18 वर्षांवरच्या सर्वांना लसीकरणाच्या कक्षेत आणण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित केल्या जात आहेत.