झटपट वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय, जाणून घ्या

झटपट वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय, जाणून घ्या

कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही अशी अनेकांची समस्या असते.प्रमाणापेक्षा कमी वजन असणे आरोग्यासाठी चांगल नसत. अशक्तपना असल्यास कोणताही आजार आपल्याला लवकर होण्याची शक्यता असते. जर आपले ही वजन कमी असेल आणि आपण ते वाढवू इच्छित असाल तर हे उपाय आपल्यासाठीच आहेत.

सकाळच्या नाश्त्यामध्ये दररोज दूधासोबत केळी खाल्ल्याने वजन वेगाने वाढते. बदामाचे दूधसुद्धा वजन वाढविण्यात खूप मदत करते. दुधासोबत काळे खजूर खाल्ल्याने सुद्धा वजन वाढते.

हिरवा पालक, ब्रोकोली, अशा भाज्या शक्य तितक्या जास्त प्रमाणात खा. तुमच्या वजनात लवकर फरक दिसेल. बटाटे, तांदूळ, दही यांचा समावेश आहारात केल्याने फरक पडेल.

जेवनात पनीराचा समावेश करा. पनीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या हाडांसाठी चांगले असते. याशिवाय पनीरामध्ये कॅलरीज देखील जास्त असतात.

वजन वाढण्यासाठी मनुके रात्री पाण्यात भिजवून रोज सकाळी खा. असे केल्याने फरक पडेल. वजन वाढण्यासाठी भिजवलेले सोयाबिन खा सोयाबीन मध्ये प्रथिन, लोह आणि फॅट असतं. त्यामुळे ताकद, वजन वाढवण्यासाठी मदत होते. वजन वाढण्यासाठी ताणमुक्त राहणे गरजेचे आहे. शक्य तितके ताणमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. या बरोबरच पुरेसा व्यायाम ही गरजेचा आहे.

भरपूर झोप घ्या. 7-8 तास झोप घेतल्यास वजन वाढण्यास मदत होते. शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास आपण जे काही खातो त्याचे पचन व्यवस्थित होते

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *