उर्मिला कोठारेमध्ये अभिनयाव्यतिरिक्त दडलेली आहे ‘ही’ कला, जाणून घ्या कोणती आहे ती ?

उर्मिला कोठारेमध्ये अभिनयाव्यतिरिक्त दडलेली आहे ‘ही’ कला, जाणून घ्या कोणती आहे ती ?

कोरोना वैश्विक महामारीमुळे जो तो सध्या घरात अडकून पडला आहे. त्यामुळे सध्या अनेक जण आपले छंद घरात राहून जोपासत आहेत. त्यामध्ये बॉलिवूड कलाकार आणि मराठी कलाकार देखील मागे नाहीत. आज आम्ही आपल्याला मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेबाबत सांगणार आहोत.

उर्मिला कोठारेचे लग्नापूर्वीचे नाव उर्मिला कानिटकर असे आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याच्याशी उर्मिलाचे लग्न झाले आहे. त्यानंतर उर्मिला कोठारे असे तिने नाव धारण केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीसह अनेक टीव्ही मालिकांमध्ये उर्मिलाने काम केले आहे. उर्मिला अभिनेत्री सोबतच एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. काही वर्षापूर्वी मराठीत माईलस्टोन ठरलेल्या दुनियादारी या चित्रपटातील तिची भूमिकाही प्रचंड गाजली होती. यासोबतच टीव्ही मालिकात तिने काम केले आहे.

सर्वांशी तिची संवादाची भूमिका असते. याला तिचा पती आदिनाथ कोठारे व महेश कोठारे यांची देखील चांगली साथ असते. उर्मिला ही अभिनेत्री तर आहेच. पण ती एक नृत्यांगना देखील आहे. ती अतिशय चांगले नृत्य करू शकते. उर्मिला कोठारेने एरियल सिल्क नावाचा नृत्य प्रकार नुकताच शिकला आहे.

या नृत्यप्रकारात ती अतिशय पारंगत आहे. असा नृत्यप्रकार करणारी ती मराठीतील एकमेव अभिनेत्री असल्याचे म्हटले जाते.

काय आहे एरियल सिल्क
एरियल सिल्क हा एक असा डान्स प्रकार आहे की जो मल्लखांबप्रमाणे असतो. म्हणजे यामध्ये दोरीऐवजी सिल्क कापड वरून बांधल्या जाते व त्यामध्ये उभे राहून नृत्य केले जाते. या नृत्यात लयबद्धता आणून विविध नृत्याचे प्रकार केल्या जातात.

उर्मिला हा नृत्यप्रकार अतिशय शिताफीने करते. त्यामुळे तिच्यासारख नृत्य आजवर कोणीही करू शकले नाही. या नृत्याचे तिचे अनेक चाहते आहेत.

दुनियादारी सह इतर चित्रपटात काम
आपल्या लोभस अभिनयाने उर्मिला कोठारेने मराठी चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या दुनियादारी, आईशप्पथ या चित्रपटांसह मालिकांमध्ये तिने काम केले आहे. असंभव, एका लग्नाची गोष्ट या मालिका प्रचंड गाजल्या होत्या.

सहज सुंदर अभिनय करून ती प्रेक्षकांना खिळवून ठेवते. लॉकडाऊन उठल्यानंतर आणखीन काही चित्रपटात काम करण्याचा मानस असल्याचे ती म्हणाली.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *