उभ्याने पाणी पीत असाल तर सावधान, ‘या’ 4 आजारांना मिळू शकते निमंत्रण….

पाणी ही मानवी जीवनाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. दररोज किमान ३ लिटर पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टर मंडळी देतात. मात्र, अनेकदा व्यस्त जीवनशैलीमुळे असे अनेकांना करता येत नाही. कामात असताना केवळ 4 ग्लास पाणी पिणे होते. मात्र, असे करणे अत्यंत धोकादायक आहे. तुम्ही कुठेही असले तरी किमान ३ लिटर पाणी हे घेतलेच पाहिजे. यामुळे तुमच्या शरीराचे संतुलन व्यवस्थित राहते.
तसेच पाणी पिण्याचे प्रकार देखील वेगवेगळे आहेत. पुराणशास्त्र तसेच आयुर्वेदामध्ये याचे वेगळे महत्त्व विशद केलेले आहे. मात्र, याकडे अनेकजण कानाडोळा करून आपली तहान भागवत असतात. मात्र, शास्त्रोक्त पद्धतीनुसार पाणी पिले तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. आम्ही आपल्याला या लेखामध्ये उभे राहून पाणी पिल्याने काय त्रास होतात याबाबत माहिती देणार आहोत.
१. किडनीचा त्रास: जर तुम्हाला उभ्याने पाणी पिण्याची सवय असेल तर हे अत्यंत धोकादायक मानले पाहिजे. उभ्याने पाणी पिल्याने किडनीचा त्रास तुम्हाला भविष्यात होऊ शकतो. त्यामुळे बैठे पद्धतीने पाणी पिले पाहिजे. उभ्याने पाणी पिल्याने किडनीची शक्ती थोडी कमी होते, असे सांगण्यात आले आहे. तसेच उभ्याने पाणी पिल्याने युरिन इन्फेक्शन तसेच लघवीवाटे जळजळ देखील होऊ शकते.
२. पोटाची समस्या: जर तुम्ही उभ्याने पाणी पीत असाल तर हे तुमच्या शरीरासाठी अतिशय घातक ठरू शकते आणि पाणी पिल्याने तुमची चयापचय क्रिया बिघडू शकते. त्यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे बैठे पद्धतीने पाणी देऊन आपली पचनशक्ती वाढवावी, असे देखील सांगण्यात येते. पोटाचा त्रास उद्भवला तर भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
३. गुडघेदुखी: जर तुम्हाला उभ्याने पाणी पिण्याची सवय असेल तर तुम्हाला इतर आजारांचा देखील सामना करावा लागू शकतो. उभे राहून पाणी पिल्यास हे पाणी थेट गुडघ्यात जाऊन तुम्हाला गुडघेदुखी ची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे बैठे पद्धतीने पाणी पिण्याचा प्राधान्यक्रम ठेवला पाहिजे.
४. अपचन: तेलकट-तुपकट आणि इतर पदार्थ खाऊन तुम्हाला अपचनाची समस्या निर्माण झालेली पाहिली असेल. मात्र, उभ्याने पाणी पिल्याने देखील तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उभ्याने पाणी कधीही पिऊ नये. त्यामुळे पोटाची समस्या निर्माण होऊन इतर आजार बळावू शकतात. याबाबत आयुर्वेदात वेगळे महत्त्व विशद करण्यात आले आहे.