‘त्या’ दोघींशिवाय कोणत्याही कलाकाराने आमची विचारपूस केली नाही..! सुशांतच्या वडिलांची प्रतिक्रिया

‘त्या’ दोघींशिवाय कोणत्याही कलाकाराने आमची विचारपूस केली नाही..! सुशांतच्या वडिलांची प्रतिक्रिया

बॉलिवूडचा हसरा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने कायमचा जगाचा निरोप घेतला. त्याला जाऊन आज 12 दिवस पूर्ण होत आहेत. 14 जूनला सुशांतने त्याच्या मुंबईतील घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येनंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. अद्यापही या धक्क्यातून अनेकजण सावरलेले नाहीत. अशात सुशांतच्या कुटुंबीयांची अवस्था आपण समजू शकतो. एकुलत्या एका मुलाला गमावल्याचे त्याच्या वडिलांचे दु:खही आपण समजू शकतो. मुलाच्या अकाली निधनाने त्यांना मोठा धक्का बसला आहे. अशात एका एंटरटेनमेंट पोर्टलला त्यांनी दिलेली मुलाखत व्हायरल होतेय.

सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनी सोशल मीडियावर अश्रू गाळले. पण सुशांतच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन करण्याचे कष्ट कोणीही घेतले नाहीत. अपवाद फक्त अभिनेत्री क्रिती सॅनन आणि अंकिता लोखंडे या दोघींचा. सुशांतचे वडिलांनी यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, ‘सुशांतच्या अंत्यसंस्काराला फार मोजके लोक आले होते. पण फक्त क्रिती सॅनन माझ्याजवळ आली आणि माझ्याशी बोलली होती. ती खूप वेळ बोलली. तिने मास्क घातला होता, त्यामुळे मी तिला ओळखू शकलो नाही. कुणीतरी ती क्रिती असल्याचे सांगितल्यावर मी तिला ओळखले. बराच वेळ ती आमच्या बाजूला येऊन बसली. आम्ही कुणीच बोलण्याच्या स्थितीत नव्हतो. ती एकटी बराच वेळ सुशांतबद्दल बोलली.

3 दिवस मुंबईत असताना अंकिताही भेटून गेली. क्रिती व अंकिता या दोघींव्यतरिक्त अन्य कोणीही आमची विचारपूस केली नाही. अंकिता मुंबईत भेटायला आली. पाटण्याला देखील ती आली होती.’

सुशांत व क्रितीने ‘राब्ता’मध्ये एकत्र काम केले होते. यादरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. सुशांत व अंकिताचे म्हणाल तर हे दोघे तर अनेकवर्षे रिलेशनशिपमध्ये होते. रिलेशनशिपमध्ये असताना अंकिता सुशांतच्या कुटुंबीयांनाही भेटली होती. मात्र दोघेही लग्न करणार अशी चर्चा असताना अचानक दोघांचे ब्रेकअप झाले होते. सुशांतच्या अंंत्यसंस्कारावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता विवेक ओबेरॉय, ऋत्विक धनजानी, क्रिती सॅनन उपस्थित होते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *