तुम्हालादेखील आल्याचा चहा आवडतो का? मग ‘हे’ वाचाच

एक कप आलं घातलेला चहा सध्या वर्क फ्रॉम होम करताना प्रत्येकाची अशी फर्माइश असतेच. आल्याचा चहा प्यायल्यानंतर थोडी तरतरी येते, ऊर्जा मिळते आणि डोकेदुखीदेखील कमी होते. मात्र चहामध्ये आलं टाकण्याचीही एक पद्धत असते आणि ती प्रत्येकाला माहिती हवी. चला तर मग जाणून घेऊयात चहामध्ये आलं कसं आणि केव्हा टाकावं.
चहामध्ये आलं नेमकं कसं टाकावं?
काही लोकं चाहमध्ये आलं किसून टाकतात तर काही जण ठेचून. यापैकी नेमकी कोणती पद्धत योग्य आहे आणि त्याचा चहाच्या चवीवर काय परिणाम होतो. खरंतर आलं हे किसूनच चहामध्ये टाकायला हवं यामुळे त्याचा रस थेट चहामध्ये जातो आणि चहाचा रंगही बदलोत.
जेव्हा आलं ठेचून टाकलं जातं, तेव्हा त्या बहुतेक रस हा ज्या भांड्यात आलं ठेचलं त्या भांड्यातच राहतो, चहामध्ये फारसा जात नाही आणि मग चहामध्ये आल्याची चव लागत नाही.
चहामध्ये आलं केव्हा टाकावं?
तुम्ही चहामध्ये आलं केव्हा टाकता यावरही त्या चहाचा स्वाद अवलंबून आहे. चहामध्ये दूध, चहापत्ती आणि साखर टाकल्यानंतर आलं टाकायला हवं. चहाला एक उकळ आल्यानंतरच त्यामध्ये आलं किसून टाकावं. यामुळे परफेक्ट आल्याचा चहा तुम्हाला मिळेल.
आल्याचे चहा पिण्याचे फायदे
आलं घातलेला चहा प्यायल्यानं पचनक्रिया सुरळीत राहते. सध्या तुम्ही घरी आहात त्यामुळे भरपूर खात असाल आणि पोट जड झाल्यासारखं वाटत असेल तर अर्ध्या तासानं आल्याच चहा प्या.
यामुळे पोटाला आराम मिळेल, पोट हलकं होईल. आल्याचा चहा प्यायल्याने पोटातील जळजळही कमी होते. शिवाय यातील व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अमिनो अॅसिड ब्लड सर्क्युलेशन नीट करतं.