हा’ व्यक्ती १२ वर्ष कोमा-मध्ये राहून आला वापस शुद्धीवर, कोमा-मध्ये असताना अनुभवलेल्या गोष्टी वाचून अंगावर येईल काटा..
कोणत्याही आईवडिलांसाठी सर्वात दुःखद काय असते ? आपल्या डोळ्यांसमोर आपल्या मुलांचा मृ’त्यू बघणे, हे कोणत्याही आईवडिलांसाठी सर्वात दुःखद घटना असते. पण त्याहूनही पी’डा’दा’यक एक गोष्ट असू शकते; आपल्या मुलाला बे’शु’द्ध अवस्थेत प्रत्येक क्षण मृ’त्यू’ची प्रतिक्षा करताना बघणे.
कोणत्याही आई-वडिलांसाठी हे मृ’त्यू’हू’नही अधिक क’ष्ट’दा’य’क असते. ज्या आई-वडिलांच्या वाट्याला हे भीषण दुःख येते, त्यावेळी त्यांच्यावर काय आ’घा’त होत असतील याबद्दलचा विचार देखील आपण करू शकत नाही. अशावेळी आई-वडील देखील आपल्या मुलाचा त्रास बघून, देवाने कमीत कमी त्याला या त्रासातून त्याला मुक्ती द्यावी, अशी प्रार्थना ते करतात.
असे काळीज पिळवटून टाकणारं दुःख कोणाच्याच वाट्याला येऊ नये असेच आपल्याला वाटते. मात्र असे दुःख एक-दोन नाही तर तब्ब्ल १२ वर्ष मार्टिन पिस्टोरिसच्या आई-वडिलांनी, संपूर्ण कुटुंबाने सहन केले. पण, त्यांच्या त्रासाचा अं’त सुखद झाला. त्यांचा मुलगा १२ वर्ष कोमा मध्ये राहून परतला.
साल १९८८, मार्टिन तेव्हा केवळ १२ वर्षांचा होता. एक दिवस आपल्या आईला अचानक घशामध्ये काही तरी दुखत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या आईला तेव्हा चिंता वाटली, पण काही सर्दी-खोखला सारखं छोटा मोठा आजार असेल असे म्हणून तिने दुर्लक्ष केले.
काही दिवसांनी तो त्रास असहनीय झाला. त्यामुळे त्याला त्वरित स्पेशल डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरु केले. अनेक प्रयत्न करून देखील मार्टिनला नक्की काय झाले आहे याचे निदान करण्यास डॉक्टर असमर्थ ठरत होते.
अनेक चाचण्या केल्या आणि त्यानंतर त्याला न्यूरॉलॉजिकल काही आजार झाला असल्याचं समोर आले. मात्र निदान होण्यापूर्वीच मार्टिन कोमा मध्ये गेला होता. त्यानंतर डॉक्टरांनी अनेक प्रयत्न करुनही, त्याला कोमाच्या बाहेर नाही काढता आलं. जवळपास २ वर्ष त्याला वेगवेगळ्या डॉक्टरांनी येऊन तपासणी केली. पण त्याच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधार झाला नाही.
अजून २-३ वर्ष, डॉक्टरांनी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले, पण मार्टिनमध्ये कसलीच सुधारणा झाली नाही. म्हणून, डॉक्टरांनी देखील त्याला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. कदाचित घरात राहून, कुटुंबासोबत राहून मार्टिनच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल अशी आशा त्यांना होती.
त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण सर्वच कित्येक तास त्याच्यासोबत गप्पा मारत बसत. प्रत्येक सणाला, वाढदिवसाला तुझी किती आठवण येत आहे असं त्याला सांगत असे. मात्र तरीही त्याच्यामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. त्याचे हाल बघून, कधी-कधी त्याचे आई वडील त्याला या त्रासातून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना करत होते.
आणि अचानक, तब्ब्ल १२ वर्षांनंतर चमत्कार घडला व मार्टिन जागा झाला. त्याच्या कुटूंबियांना काहीच सुचत नव्हते, मात्र योग्य उपचारासाठी त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा समजले कि, तब्ब्ल १० वर्षांपूर्वीपासून आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटना मार्टिनला समजू लागल्या होत्या.
त्याला जेव्हा घरी घेऊन जाण्यात आले, तेव्हा आपली रूम, आपले कुटुंबीय त्याचे प्रेम त्याला जाणवत होते. त्याने खूप प्रयत्न करून देखील त्याला आपले डोळे उघडता येत नव्हते आणि त्यामुळे त्याला काहीच दिसत नव्हते. तो नेहमी आपल्या मेंदूला सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करत असे. त्यासाठी तो अनेक बेरीज-वजाबाकी देखील करत असे.
आपल्या कुटूंबियांची प्रेम बघून, उठून त्यांना घट्ट मिठी मारावी असं त्याला वाटायचं पण जमत नव्हतं. त्याने खूप प्रयत्न करुन, आपले बोटं हलवले होते. पण त्याकडे खास लक्ष गेले नाही. आणि अचानक जेव्हा तू शुद्धीवर आला,तेव्हा त्याच्या कुटुंबियांना फक्त त्याला बिलगून रडायला येत होत.
डॉक्टरांनी उपचार सुरु केले आणि आता मार्टिन पूर्णपणे बरा झाला आहे. १२ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर तो जागा झाला, मात्र त्याची चालण्याची आणि बोलण्याची क्षमता तो गमावून बसला आहे. त्याच्या आईने त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर बनवले आहे, ज्याच्या मदतीने तो आता बोलू देखील शकतो. काही वर्षांपूर्वीच मार्टिनचा विवाह देखील झाला आहे.