‘आई कुठे…’ मालिकेतील ही लोकप्रिय अभिनेत्री देखील अडकली को’रो’ना’च्या विळख्यात; पोस्ट करत म्हणाली २ डोस घेऊनही माझी अवस्था…

‘आई कुठे…’ मालिकेतील ही लोकप्रिय अभिनेत्री देखील अडकली को’रो’ना’च्या विळख्यात; पोस्ट करत म्हणाली २ डोस घेऊनही माझी अवस्था…

दिवसेंदिवस पुन्हा एकदा को’रो’नाचा प्रसार चांगलाच वाढत असल्याचे बघायला मिळत आहे. माघील दोन लाटेच्या तुलनेत सध्या तरी, कोरोनाची तीव्रता कमी जाणवत असली तरीही त्याला हलक्यात घेणे चुकीचेच ठरेल. को’रो’नाच्य्या आजाराने माघील दोन वर्षांमध्ये आपल्याला अत्यंत भयानक दिवस बघायला लावले.

कित्येकजण आपल्या प्राणांना देखील मुकले. त्यामुळे पुन्हा एकदा को’रो’ना तोंड वर काढत असताना आपण स्वतःची काळजी घेणेच उत्तम आहे. यावेळी देखील को’रो’नाचा विळखा चांगलाच वाढत आहे. बॉलीवूड मधील अनेक कलाकार आणि त्यांच्या कुटुंबियांना को’रो’नाची लागण झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

सोबतच साऊथ इंडस्ट्री मधील देखील अनेक मोठाल्या कलाकरांना को’रो’नाची लागण झाली. आपल्या राज्यात अनेक मंत्री देखील या विळख्यात अडकले असल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच आता को’रो’ना मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये देखील आपले हात-पाय पसरवत असल्याचे बघायला मिळत आहे.

नुकतंच टेलिव्हिजन वरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला को’रो’नाची लागणं झाल्याची बातमी समोर आली आहे. आई कुठे काय करते मालिकेतील संजना आज घराघरात पोहोचली आहे. बिग बॉस २ मधून आपल्या करियरची नवीन सुरुवात करणाऱ्या रुपाली भोसलेला आई कुठे काय करते मधील संजना म्हणून खरी ओळख मिळाली.

रुपाली भोसलेंचा आज मोठा चाहतवर्ग आहे. मालिकेमध्ये रुपालीने निगेटिव्ह भूमिका साकारली असली तरीही, तिची भूमिका खूप जास्त प्रसिद्ध झाली आणि तेवढीच लोकप्रिय देखील ठरली. रुपाली भोसले एका नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. एका मराठी गाण्यामध्ये रुपाली आता झळकणार आहे.

या सर्व चर्चा सुरु असतानाच रुपालीने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वरून केलेल्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रुपाली भोसलेला को’रो’नाची लागण झाली असून तिने आपल्या पोस्टमधून त्याबद्दलची माहिती दिली आहे. ‘दोन्ही डोस घेऊन झाले. सर्व नियम पाळले.

त्यानंतर देखील को’रो’नाची लागण झाली. कुठून कशी आता ते म्हत्वाच नाहीये. काळजी घेणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुम्ही देखील काळजी घ्या. मास्क आणि सॅनेटायझर वापरा. ;लवकरच मी बरी होणार आहे. पण तुम्ही नक्कीच काळजी घ्या. पुन्हा एकदा को’रो’ना पसरत आहे. २ डोस घेतले म्हणून बिनधास्त राहू नका,’ अशी पोस्ट रुपालीने केली आहे.

तिला को’रो’नाची लागण झाल्याचे समजताच तिच्या चाहत्यानी लवकरात लवकर बरी हो, अशा आशयाचे कमेंट्स केले आहेत. मराठी गाण्यामध्ये काम करण्यासाठी रुपालीने मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. मात्र असं असलं तरीही, आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवरील सर्वांची को’रो’ना चाचणी करण्यात असल्याची बातमी समोर आली आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.