नवीन आयुष्याची सुरवात करण्याआधीच झाला शेवट ! लग्नाच्या वरातीत नाचताना नवरदेवाचा झाला मृ त्यू…

लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि आनंदाचा क्षण समजला जातो. संपूर्ण आयुष्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणून लग्नाकडे बघतील जातं. आपल्याला आयुष्याचा जोडीदार सोबत भेटला, यामुळे मुलगा मुलगी आनंदी असतात. म्हणून तर कोणच्याही लग्नाच्या वेळी नवरदेव नवरी तर आनंदी असतातच.
सोबत त्यांचे कुटुंबीय, मित्र-परिवार देखील आनंदी असतात. डीजे, गाणे, नाच हे सगळं आता जवळपास प्रत्येक लग्नामध्ये खूपच सामान्य झाले आहे. मेहंदी, हळदी, संगीत या समारंभाला अनेकजण खास डीजे बोलवतात आणि आनंदाच्या भरात मनसोक्त नाचतात.
या आनंदात कधी कधी सगळेचजण इतके जास्त धुंद होऊन जातात की काही दुर्घटना होऊ शकते याचे त्यांना भानच राहत नाही. आणि अशा वेळी विवाहाच्या वेळी आनंदाच्या भरात झालेल्या दुर्घटना अत्यंत वेदनादायक ठरतात. उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब या भागात तर लग्नाच्या वेळी बंदुका चालवत गोळीबार करण्याची प्रथा आहे.
यामध्ये अनेक वेळा या गोळ्या थेट नवरदेवाला लागल्याच्या घटना आपल्यासाठी काही नव्या नाहीत. आनंदाच्या भरात भान ठेवता केलेल्या कृत्याने आयुष्यभराचे दुःख मिळते. अशीच एक दुर्दैवी घटना नुकतीच सुरत मधून समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण गुजरातला मोठा धक्का दिला आहे.
वरात निघण्यापूर्वीच नवरदेव मित्रांसोबत डीजेच्या तालावर नाचत होता. त्याच वेळी असं काही घडलं की त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. हे प्रकरण सुरत जिल्ह्यातील मांडवी तहसील अंतर्गत असलेल्या अरेथ या गावातील आहे. मितेश भाई चौधरी यांची वरात बालोद तालुक्यातील धामंडळा गावात जाणार होती.
वरात निघण्यापूर्वीच बहुतांश विधी पूर्ण करण्यात आले. थोड्या वेळानंतर वरात निघणार होती. या आनंदाच्या प्रसंगी वराचे मित्रमंडळ आणि कुटुंबीय डीजेच्या तालावरती बेधुंद होऊन नाचत होते. आपल्या मित्रांना अशा प्रकारे आनंदात नाचताना बघून मितेशला देखील नाचण्याची इच्छा झाली व तो देखील डीजे जवळ पोहोचला.
मितेशला नाचताना बघून त्याच्या मित्रांना अधिकच जोश आला आणि त्याच्या मित्रांनी त्याला खांद्यावर उचलून घेतलं. त्यानंतर अचानकच मितेशच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. कुटुंबियांनी तात्काळ मितेशला मोटरसायकलवर बसून तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला.
आणि त्याला मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेतून त्याला बारडोली येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही माहिती मिळताच संपूर्ण चौधरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. लग्नाच्या केवळ काहीच तास आधी नवरदेवाच्या निधन झाल्यामुळे अत्यंत आनंदी क्षण तेवढाच दुःखद आणि वेदनादायक क्षणामध्ये बदलला.