तांदळाच्या पाण्याने होतात आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

तांदळाच्या पाण्याने होतात आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

शिजवलेला भात तर आपण सगळेच खातो. पण कधी आपण या भाताचे पाणी (पेच) पिऊन बघितले आहे का ? आपल्याला हे ऐकून विचित्र वाटत असेल पण शिजवलेल्या तांदळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. आपल्या माहिती नसल्यास तांदळाच्या पाणी पिण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया….

1. तांदूळ शिजवून झाल्यावर जेव्हा आपण भात काढून घेता तेव्हा त्यामधील पाणी फेकून देता. असे न करता ते पाणी पिण्यासाठी वापरावे. हे आपल्या शरीरासाठी ऊर्जा मिळविण्याचा चांगला स्रोत आहे. जे कार्बोहायड्रेट्सने परिपूर्ण आहे. दररोज सकाळी हे पाणी प्या आणि आपली ऊर्जा वाढवा. ऊर्जा वाढविण्यासाठी हा सोपा उपाय आहे.

2. तांदळाचे पाणी फायबराने पुरेपूर असतात. हे आपल्या मेटाबॉलिझमला वाढविण्यात मदत करतात. पचन तंत्र सुधारून चांगल्या जिवाणूंना सक्रिय करण्याचे काम करतात. जेणे करून आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही.

3. मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा जुलाब लागल्यावर तांदळाचे पाणी देणे फायदेशीर असतं. त्रासाच्या सुरुवातीस तांदळाच्या पाण्याचे सेवन केल्याने आपण गंभीर दुष्परिणामांपासून वाचू शकता.

4. व्हायरल इन्फेक्शन किंवा ताप आला असल्यास तांदळाचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होत नाही आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत राहणार. जेणे करून आपल्याला लवकर बरे होण्यास मदत मिळेल.

5. शरीरात पाण्याची कमी डिहायड्रेशन (निर्जलीकरण)च्या रूपात होते. विशेष करून हा त्रास उन्हाळ्यात जाणवतो. तांदळाचे पाणी आपल्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेला संतुलित करतं.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *