T20 WC: दोन सामन्यातील पराभवानंतरही भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत; असं असेल गणित!

सध्या सगळीकडे, वर्ल्ड -कप टी-२० धूम बघायला मिळत आहे. यामध्ये, जगातील सर्वच देश, वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आपल्या प्रयत्नांची शर्थ करत असल्याचे बघायला मिळत आहे. अफगाणिस्तानच्या संघाचे विशेष कौतुक होत आहे. कोणताही सपोर्ट नसताना, अफगाणिस्तानचा संघ स्वतःच्या बळावर वर्ल्ड-कप सामन्यांमध्ये सहभागी झाला आहे.
त्यांचे प्रदर्शन देखील कौतुकास्पद आहे. मात्र दुसरीकडे, आपल्या भारत देशाच्या संघाने क्रिकेटप्रेमींना चांगेलच निराश केले आहे. सर्वात पहिला सामना, भारत आणि पाकिस्तानचा होता. या सामन्यामध्ये, भारताला अत्यंत लाजिरवाणी हार स्वीकारावी लागली. मात्र, पाकिस्तान वर्ल्ड-कपमध्ये आजवर कधीच भारताला हरवू शकला नव्हता.
म्हणून भारताच्या क्रिकेटप्रेमींनी ही हार मोठ्या मनाने स्वीकारली. पण काल, पुन्हा एकदा न्यूझीलंड सोबतच्या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाला हार पत्करावी लागली. त्यामुळे, आता मात्र क्रिकेटप्रेमी चांगेलच नाराज झाले असून, संपूर्ण भारतीय संघावर टीकास्त्र सुरु आहे. पण यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आता असा आहे की, पाठोपाठ दोन पराभवानंतरही भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल होऊ शकतो का? आता उपांत्य फेरीपर्यंत धडक मारण्याचा भरतीय क्रिकेट संघाचा प्रवास अत्यंत खडतर झाला असला तरीही ते अशक्य नाहीये. उर्वरित तीन सामन्यांसोबत भारताचं उपांत्य फेरीचं गणित न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्यावर अवलंबून आहे.
उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि फिरकीपटू ईश सोधी यांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागतीच पत्करली.
न्यूझीलंडने भारताला २० षटकात ७ बाद ११० धावांवर रोखले. प्रत्युत्तरात सलामीवी डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी दमदार भागीदारी रच न्यूझीलंडच्या विजयावर सहज शिक्कामोर्तब केले. सोधीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडने भारताला पराभूत करण्याची परंपरा मात्र कायम राखली.
यामुळे भरतीय क्रिकेटप्रेमी मात्र चांगलेच नाराज झाले आहेत. या सामन्याबद्दल बोलत असताना कर्णधार विराट कोहली म्हणाला की, ‘ फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यावर आमचे प्रदर्शन नक्कीच निराशाजनक ठरले. आम्ही मैदानात उतरलो तेव्हा आमची देहबोली काहीशी कमकुवत होती, तुलनेत न्यूझीलंड संघाची तीव्रता आणि देहबोली चांगली होती.
जेव्हा आम्ही पहिल्या डावात धावा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही संधी साधल्या आणि विकेट गमावल्या. यामुळे आम्ही शॉटसाठी जावे की नाही याबद्दल सहाजिकच संकोच करत होतो. भारताकडून खेळताना सर्वांच्याच खूप अपेक्षा असतात. लोक आमच्यासाठी स्टेडियममध्ये येतात आणि भारतासाठी खेळणाऱ्या प्रत्येकाने ते स्वीकारले पाहिजे , त्याचा सामना केला पाहिजे.
आम्ही या दोन सामन्यांमध्ये तसे केले नाही आणि म्हणूनच आम्ही जिंकलो नाही. पण, आपण आशावादी आणि सकारात्मक असायलाच हवे आणि मोजून जोखीम पत्करली पाहिजे. आता जरी संघावर जिंकण्यासाठी दबाव असला तरीही आम्हाला दबावापासून दूर राहावे लागेल आणि आमची प्रक्रिया सुरू ठेवावी लागेल आणि सकारात्मक क्रिकेट खेळावे लागेल.
या स्पर्धेत खेळण्यासाठी भरपूर क्रिकेट आहे.’ विराट कोहलीच्या बोलण्यात आशावाद असला तरीही, उपांत्य फेरीचा गणित आता चांगलाच अवघड होऊन बसलं आहे. तर पुढील सामन्यांचा गणित असं हवं की, आता भारताने अफगाणिस्तानला ८० हून अधिक धावा, स्कॉटलँडला १०० हून अधिक धावा, नामिबियाला १०० हून अधिक धावांनी पराभूत केलं पाहीजे.
सोबतच अफगाणिस्तानने न्यूझीलंडला कमी अंतराने पराभूत केलं पाहीजे. आणि न्यूझीलंडने स्कॉटलँड आणि नामिबियाला जवळपास ५० धावांपेक्षा कमी धावांनी पराभूत केलं पाहीजे. हे सर्व जर असच झालं तर, भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड-कप टी-२०च्या उपांत्य फेरीत दाखल होऊ शकतो.