सुशांत सिंह राजपूत याच्या ‘या 55’ इच्छा राहिल्या अपूर्ण.. दर महिन्याला फ्लॅट साठी द्यायचा साडेचार लाख रुपये भाडे..

बॉलिवूडचा नव्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर अवघे बॉलिवूडसह त्याचे चाहते हळहळले. दिवसभर काल एकच चर्चा होती ती सुशांत सिंह राजपूत याची. कोरोनामुळे असलेल्या रुग्णसंख्याच्या बातम्या देखील काल मागे पडल्या होत्या. तर केवळ सुशांत सिंह राजपूत यांची काल चर्चा होती.
गेल्या महिन्यातच ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर, इरफान खान यांचे निधन झाले. तसेच गेल्या ३२ दिवसांमध्ये तब्बल अकरा अभिनेत्यांनी या जगाला राम राम केला आहे. सुशांत सिंह राजपूत याची एक्झिट मात्र अतिशय चटका लावणारी आहे. वयाच्या 34 व्या वर्षी त्याने आपले जीवन संपवले. याबाबत अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्याने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली. याबाबतही चर्चा उपस्थित होत आहे.
मात्र, यामागील सत्य सर्वांसमोर येईल याबाबत कोणीही शाश्वत नाही. पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांत सिंह राजपूत याने छोट्या पडद्यावर ओळख निर्माण केली होती. त्यानंतर खूप कष्ट करून त्याने बॉलिवूडमध्ये आपले करियर बसवले होते. पवित्र रिश्ता मधील अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यासोबत त्याचे प्रेमप्रकरण होते. काही वर्ष ते सोबत राहिल्यानंतर त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाले होते.
विशेष म्हणजे सुशांत याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या महिला मॅनेजरने देखील आठ दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. त्यांच्यात काही संबंध होते का? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत हा दीड वर्षापासून तणावात असल्याचे सांगण्यात येते. त्याच्यावर उपचारही सुरू होते, असेही म्हटले आहे. त्याच्या घरांमधून डॉक्टरच्या काही पावत्या सापडले आहेत. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.
सुशांत सिंह राजपूत याने छिछोरे, महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावरील धोनी या चित्रपटातून वेगळी ओळख निर्माण केली होती. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाची बातमी कळताच त्याचे वडील के. सिंह बेशुद्ध होऊन कोसळले. त्याचे कुटुंब बिहारमधील पूर्णिया येथील रहिवासी होते. 2000 मध्ये ते दिल्लीत स्थायिक झाले होते. 2002 मध्ये त्याच्या आईचे निधन झाले होते. त्याची बहीण राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे. त्याला चार बहिणी आहेत.
सुशांत याचादेखील विवाह ठरला होता. नोव्हेंबरमध्ये तो लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्या आधीच ही दुर्घटना घडली. सुशांत सिंह वांद्रे येथील फ्लॅटमध्ये राहत होता. 2022 पर्यंत त्याने फ्लॅटबाबत करार केला होता. या फ्लॅटसाठी तो दर महिन्याला तब्बल साडेचार लाख रुपये भाडे द्यायचा.
सुशांत सिंह राजपूत याला खगोल शास्त्राची देखील प्रचंड आवड होती. मुलांना अंतराळाची माहिती देण्याचे काम करण्याचे स्वप्न पाहत होता. त्याने आपल्या घरातील एका खोलीत अंतराळाची सर्व माहिती भिंतीवर लावून ठेवली होती. याचबरोबर तो अंतराळाची माहिती घेत होता. सुशांत इतर कलाकारांप्रमाणे आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर देखील आपले चित्रपट आणि फोटो शेअर करत नव्हता. चांगले विचार शेअर करायचा. तो नेहमी सर्व पोस्ट डिलीट करून पुन्हा नव्याने सुरुवात करायचा.
ही होती त्याची स्वप्ने..
विमान शिकवणे व चालवणे, इंजिनिअरिंग हॉस्टेलमध्ये एक रात्र थांबणे,नासाच्या वर्कशॉप मध्ये भाग घेणे, खेळाडूंसोबत बुद्धिबळ आणि टेनिस खेळणे, डाव्या हाताने क्रिकेट खेळणे, ब्ल्यू हॉलमध्ये पोहणे, मोफत शिक्षण देणे, ॲक्टिव व्होल्ककॅनोचख फोटो काढणे यासह त्याच्या 55 इच्छा होत्या. या त्याने लिहून देखील ठेवल्या होत्या
सुशांत सिंह राजपूत भारत सरकारच्या महिला उद्योजक ब्रँड ॲम्बेसिडर होता. याविषयी खूपच कमी लोकांना माहीत असेल. शिवाय जी मुले आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतात. अशा तरुणांसाठी त्याने संस्था उघडली होती.