सुशांतच्या वडिलांचा रिया आणि श्रुतीला केलेला ‘तो’ मेसेज समोर, प्रकरणाला नवीन वळण

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आ*त्म*ह*त्येप्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे गेला आहे. मुंबई पोलिसांनीही तपासाचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टात दाखल केला आहे. या रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे आता नवीन बाजू समोर येत आहे.
सुशांतचे वडील केके सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्यातील व्हॉट्सअॅपवर झालेल्या संवाद आता पुढे आला आहे. सुशांतबद्दल त्याच्या वडिलांनी 29 नोव्हेंबर 2019 मध्ये रियाला हा मेसेज केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतचे वडील रियाला विचारता की, ‘जर तुला माहिती आहे की मी सुशांतचा वडील आहे. तर तू माझ्यासोबत बोलली का नाहीस?. अखेर अशी काय गोष्ट आहे? जर तू मित्र म्हणून त्याची देखभाल करत असेल तर माझेही कर्तव्य बनते की, सुशांतबद्दल सगळी माहिती मिळाली पाहिजे. यासाठी तू मला फोन करून माहिती दे’
सुशांतच्या वडिलांनी हा मेसेज केल्यानंतरही रियाने यावर कोणतेही उत्तर दिले नाही.
त्यानंतर केके सिंह यांनी श्रुती मोदीशी संपर्क केला. त्यांनी त्याच दिवशी 29 नोव्हेंबर 2019 रोजी सुशांतबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी फोन केला होता. पण श्रुतीने कोणतेही उत्तर दिले नाही.
सुशांतच्या वडिलांनी श्रुतीचा मेसेजकरून याबद्दल जाब विचारला होता. ‘मला माहिती आहे की तू सुशांतचे कर्ज आणि त्याची देखभाल करत आहे. सुशांतची अवस्था काय आहे ते जाणून घेण्यासाठी तुला फोन केला होता. सुशांतशी कालच बोलणे झाले होते, तो खूप परेशान असल्याचं सांगत होता.
एक वडील म्हणून मला तिच्या काळजी वाटत आहे. जर तू बोलण्यास उत्सुक नसशील तर मला विमानाचे तिकीट पाठवून दे, मला मुंबईत यायचे आहे’ अशी मागणी त्याच्या वडिलांनी श्रुतीकडे केली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसातील अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती उजेडात आणली आहे.
‘सुशांत आणि रिया चक्रवर्तीमध्ये आ*त्म*ह*त्येपूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. एकमेकांच्या कुटुंबीयांच्या विषयावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला होता की, दोघांनी एकमेकांवर हात उचलला होता. त्यामुळे रागारागा रिया सुशांतचे घर सोडून गेली होती. एवढंच नाहीतर रियाने सुशांतचा नंबरही ब्लॉक केला होता’ अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर 14 जून रोजी सुशांतने आपल्या राहत्या घरात ग*ळफा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली.