Big Boss Marathi : स्नेहा वाघने पुन्हा एन्ट्री झाल्यामुळे ‘या’ स्पर्धकावर साधला निशाणा, म्हणाली; आपलेच मित्र मागून आपली…

Big Boss Marathiचे यंदाचे पर्वत चांगलेच रंगलेले पाहायला मिळत आहे. यंदाच्या पर्वात बर्याच नवीन गोष्टी बघायला मिळत आहेत. यावेळी अनेक स्पर्धक वेगवेगळ्या प्रकारे आपला खेळ सादर करत आहेत. त्यामध्ये काही स्पर्धकांचा खेळ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला तर, काहींवर सडेतोड टी’का होत आहे.
एकूणच शोचा टीआरपी चांगलाच वाढला आहे. त्यामुळे मेकर्सने आता शो एक्सटेंड करायचा निर्णय घेतला आहे. बिग बॉस मराठीचा पर्व साधारण डिसेंबर मध्ये संपणार होता. परंतु आता वाढती लोकप्रियता बघता बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व जानेवारी महिन्यापर्यंत रंगणार असल्याचे मेकर्सने सांगितले आहे. त्याच पार्श्वभूमीवर या आठवड्यात कोणतेही एविक्शन झाले नाही.
म्हणजेच कोणताही स्पर्धक घराच्या बाहेर गेला नाही. तर आता 3 जुन्या सदस्यांची घरामध्ये पुन्हा एन्ट्री होणार आहे. स्नेहा वाघ, आदिश आणि तृप्ती देसाई हे तीन स्पर्धेत पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेणार आहेत. त्याबद्दलचा एक प्रोमो नुकताच कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरती टाकण्यात आला.
या प्रोमोप्रमाणे घरातील स्पर्धका सोबतच प्रेक्षकांना देखील मो’ठा ध’क्का बसला आहे. या प्रेमामध्ये स्नेहा वाघ, घरातील आपल्या सर्वात चांगल्या मित्राला म्हणजेच जय दुधानेला टार्गेट करत असल्याचे बघायला मिळाले आहे. बिग बॉसच्या घरात असताना स्नेहा वाघाची जय दुधाने सोबतची मैत्री मोठ्या चर्चेचा विषय बनली होती.
अनेक वेळा स्नेहाने इतर सदस्यांना डावलून जय दुधानेला समर्थन केल्याचे बघायला मिळाले होते. त्यामुळे बऱ्याच वेळा तिला अफे-अर देखील ठरवण्यात आले. मात्र या सर्वांची पर्वा न करता तिने आपली मैत्री निभावली. परंतु घराच्या बाहेर गेल्यानंतर जय केवळ गेम साठी आपला उपयोग करून घेत आहे हे कदाचित स्नेहाच्या लक्षात आले असावे.
म्हणूनच प्रोमोमध्ये स्नेहा वाघने थेट जय दुधानेवर नि’शाणा साधल्याचे बघायला मिळत आहे. ‘आपलेच मित्र जेव्हा आपल्या पा’ठीत खं’जीर खु’पसतात तेव्हा सर्वात जास्त दुःख होते. माझ्याकडून जी फक्त आणि फक्त मैत्री होती, ते सर्वकाही जय दुधाने साठी केवळ एक खेळ होता. गेमच्या सुरुवातीपासून जयने केवळ माझा उपयोग करून घेतला.
आपलेच मित्र आपल्या मागुन आपली एवढी जास्त इज्जत नाही काढत.’ असे प्रोमोमध्ये स्नेहा वाघ बोलत असल्याचे बघायला मिळाले. हे ऐकल्यानंतर जय चांगलाच भाऊक झाल्याचे देखील बघायला मिळत आहे. तर मीरा आणि उत्कर्ष त्याची समजूत काढत असल्याचे दिसत आहे. उत्कर्ष जयला बोलताना दिसत आहे की, ‘झालेल्या चुका मान्य करणे हेच खरे शहाणपण असते.
तू आत्ताच जाऊन तिला माफी वगैरे मागू नकोस किंवा सॉरी म्हणू नकोस. आपल्याला खेळ कसा खेळायचा हे माहित आहे ना, मग बाकी गोष्टींची चिंता तू करू नकोस. जो गेम आहे तो आपण व्यवस्थितच खेळणार. बाकी सगळ्या गोष्टी मनातून काढून टाक आणि फक्त आणि फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर.’ पण आता तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्य या तिघांच्या घरात येण्यामुळे घरात काय गोंधळ होतो हे बघणे रोमांचकारी ठरेल.