एकाचवेळी वेस्ट इंडिजच्या 2 दिगग्ज क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती…

क्रिकेटविश्व खूप मोठं आहे. खेळत असताना, ग्राऊंडवर जरी हे खेळाडू, विरोधी पक्षात खेळत असले तरीही ते कायमच एकमेकांच्या खेळाचा सन्मान करत असल्याचं आपण पाहिलं आहे. एक सर्वोत्कृष्ट खेळाडू कायमच उत्तम खेळाचा आदर करतो आणि स्वतःचा पराभव स्वीकारून त्या खेळाडूचा मान देखील राखतो.
असे अनेक उदाहरण आपण इतर खेळांमध्ये देखील पहिले आहेत,आणि क्रिकेटमध्ये तर नेहमीच बघत असतो. यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये असे अनेक जादुई क्षण आपल्याला बघायला आणि अनुभवायला मिळाले. या वर्ल्ड-कप नंतर आता क्रिकेटवश्वामधे अनेक वेगवेगळे बदल आपल्याला बघायला मिळणार आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार, विराट कोहलीने पूर्वीच घोषणा केली होती की, या सामन्यांनंतर तो आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. तर काही देशांच्या खेळाडूंनी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपण संन्यास घेणार असल्याच सांगितलं आहे. क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला जेव्हा, वेस्ट इंडिजच्या एक नाही तर दोन खेळाडूंनी संन्यास घेणार असल्याच सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी, वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ब्रावो आपण लवकरच संन्यास घेणार असल्याचे संकेत दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर, काल अर्थात ६ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळण्यात आलेला सामना ब्रावो आणि अजून एका वेस्ट इंडिजच्या खेळाडूचा अखेरचा सामना ठरला.
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत शनिवारी अर्थात ६ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही बलाढ्य संघ, जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्त करत होते. पण, या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. यासह हा सामना ब्रावो आणि ख्रिस गेलच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला.
ब्रावो आणि ख्रिस गेलं या दोन्ही खेळाडूंचे केवळ वेस्ट इंडिज मध्येच नाही तर संपूर्ण जगात मोठा चाहतवर्ग आहे. आयपीएलच्या सामन्यांमध्ये तर ब्रावो आणि ख्रिस गेलचे शॉर्ट्स बघून अनेकजण आश्चर्य चकित होतात. वेस्ट इंडिजच्या संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये आजपर्यंत दोन वेळेस विजेतेपद पटकावले आहे.
पण, आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत, उत्तम कामगिरी करण्यात वेस्ट इंडिजचा संघ अपयशी ठरला आहे. ५ सामन्यांपैकी, या संघाने केवळ एकच सामन्यात विजय मिळवला आहे. ज्यामुळे वेस्ट इंडीज संघ आता स्पर्धेतून बाहेर झाला आहे. म्हणून हा सामना, आता ब्रावो आणि गेलं दोघांसाठी देखील अंतिम सामना ठरला आहे.
या सामन्यानंतर, दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या संघाने गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यांच्यासोबतच, मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांनी देखील टाळ्या वाजवून, या दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले. टी-२० क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे विक्रम करणाऱ्या ख्रिस गेलने वेस्ट इंडिज संघाला २ वेळेस जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
पण यंदाच्या मोसमात त्याच फॉर्म कुठे तरी गायब झाल्याचा जाणवला. सामना झाल्यानंतर, ब्रावोने डेविड वॉर्नरसोबत मिळून चॅम्पियन या गाण्यावर डान्ससुद्धा केला. त्याचसोबत त्याने मैदानात फिरून चाहत्यांचे आभार मानले. त्याबद्दल बोलतान ड्वेन ब्रावो म्हणाला की, ‘जोपर्यंत मला माझ्या शरीराची साथ मिळेल, मी फ्रँचायजी क्रिकेट खेळत राहणार.’
तर ख्रिस गेलं म्हणाला की, ख्रिस गेल म्हणाला की, ‘माझी कारकीर्द अद्भुत राहिली आहे. अजूनपर्यंत मी, अधिकृतरित्या निवृत्तीची घोषणा केली नाहीये. मला जर जमायकाच्या प्रेक्षकांसमोर खेळन्याची संधी मिळाली, तर मी नक्कीच खेळेल.’