को’रोनात फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यासाठी करा श्वसनाचे ‘5’ महत्त्वाचे व्यायाम, जाणून घ्या..

को’रोनात फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यासाठी करा श्वसनाचे ‘5’ महत्त्वाचे व्यायाम, जाणून घ्या..

को’रो’ना म’हामा’रीनं संपूर्ण देशाला सं’कटात टाकलं. दररोज ४ लाखांच्या पुढे को’रो’नाबाधित रु’ग्ण आढळून येत आहेत. देशाच्या आ’रोग्य यंत्रणेवर प्र’चंड ता’ण आला आहे. को’रो’ना वि’षाणू लोकांवर गं’भीर प’रिणाम करत आहेत. हा वि’षाणू थेट लोकांच्या फु’फ्फुसां’वर ह’ल्ला करतो. त्यामुळे लोकांची श्व’सनसं’स्था निकामी होण्याचा धो’का असतो. अशावेळी लोकांनी आपली श्वसनसंस्था सुरक्षित ठेवण्यासाठी काही टीप्स फॉलो करणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला असे काही व्यायाम प्रकार सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुमची श्वसनसंस्था मजबूत होईल.

१) खोल श्वास: हा सर्वात सोपा आणि महत्त्वाचा श्वास आहे. यामुळे फुफ्फुसे मजबूत होतात, तसेच रक्त प्रवाह सुधारतो, इम्युनिटी वाढते आणि ताण कमी होतो.

कसा करायचा व्यायाम- निवांत जमिनीवर बसा, मोठा श्वास घ्या. यावेळी श्वास घेण्याचा आणि श्वास सोडण्याची वेळ मोजा. प्रत्येक श्वासागणिक वेळ वाढवा. २ के ५ मिनिटांपर्यंत हा व्यायाम करा.

२) डायफ्रामामॅटिक श्वास: यामध्ये ताण, राग कमी होण्यास मदत होते. लोक सहसा त्यांच्या फुफ्फुसांचा परिपूर्ण वापर करत नाहीत. या व्यायाम पद्धतीने फुफ्फुसांची श्वसन क्षमता वाढण्यास मदत होते.

कसा करायचा व्यायाम- जमिनीवर रिलॅक्सपणे बसा. एक हात छातीच्या खाली आणि पोटाच्या वरती ठेवा. diaphragm याच ठिकाणी असते. मोठा श्वास घेऊन तो हळूहळू बाहेर सोडा.

3) हृदय व्यायाम- याचा फायदा तुम्हाला हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी होतो. यामुळे तुमच्या शरीरात अधिकप्रमाणात ऑक्सिजन घेतले जाते. यामध्ये जोरात चालणे, स्पॉट जॉगिंग, दोरी उड्या, पायऱ्या चढणे या व्यायाम पद्धतीचा समावेश होतो.

4) अनुलोम-विलोम: याला नाकपुड्यांचा श्वास असंही म्हटलं जातं. हा प्राणायमचा प्रकार असून हटयोगामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे श्वसनसंस्थेची शक्ती वाढण्यास मदत होते. रिकाम्या पोटी हा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

कसा करायचा व्यायाम- जमिनीवर किंवा खुर्चीवर बसा. उजव्या हाताचा अंगढ्याने तुमची उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. आता उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. तुमच्या मधल्या बोटाने आणि करंगळीच्या शेजारच्या बोटाने डावी नाकपुडी बंद करा. आता उजव्या नाकपुडीने श्नास घ्या. हीच प्रक्रिया वारंवार करा.

५) भ्रामरी- या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो माशी. ही गुंजन करण्याचा प्रकार असून यामुळे रक्त प्रवाह सुरळीत राहतो. यात तुम्ही तुमच्या अंगठ्याने कान बंद करा आणि मधले बोट आणि अनामिकेने डोळे बंद करा. तर्जनी भुवयांच्यावरती ठेवा आणि करंगळी गालावर ठेवा. श्वास घेताना माशीसारखा गुंजन्याचा (हम्म्म) आवाज करा. १० मिनिटांपर्यंत तुम्ही हा व्यायाम करु शकता.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *