सॅनिटायजर लावण्याचा काहीच उपयोग नाही; जर करत असाल ‘या’ ५ चुका, जाणून घ्या कोणत्या

सॅनिटायजर लावण्याचा काहीच उपयोग नाही; जर करत असाल ‘या’ ५ चुका, जाणून घ्या कोणत्या

कोरोनासोबत जगत असताना मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टेसिंग आपल्या जीवनाचा भाग बनलं आहे. जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी लोकांनी सॅनिटायजरची सवय लावून घेतली आहे. हातावरील किटाणू नष्ट करण्यासाठी सॅनिटायजर हा सोपा उपाय आहे.

पण जर तुम्ही खिशात सॅनिटायजर ठेवून त्याचा सतत वापर करत असाल तर सावध व्हायरल हवं. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्थिती सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला हॅण्ड सॅनिटायजरचा वापर करण्याची गरज लागणार नाही.

जेव्हा तुमच्याकडे साबण आणि पाणी असेल

जेव्हा तुमच्याकडे साबण किंवा पाणी असेल तर तेव्हा हॅण्ड सॅनिटायजरचा वापर करू नका. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार किटाणूंपासून वाचण्यााठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे २० सेकंदांपर्यंत हात साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुणं, कारण सॅनिटायजरच्या तुलनेत साबणाने हात धुतल्यास पाण्यासोबत जंतू वाहून जातात.

हात खराब दिसत असतील

जर तुम्ही अस्वच्छ आणि मळलेल्या हातांवर सॅनिटायजर लावत असाल तर त्यामुळे हातांवर घाण तशीच चिकटून राहू शकते. अल्कोहोल बेस्ड सॅनिटायजर तुमच्या हातांवर घाण दूर करत नाही तर व्हायरस आणि बॅक्टेरियांना निष्क्रिय करण्यासाठी प्रभावी ठरत असतो.

उदा. तुम्ही बाग काम करत असाल, बाहेर फेरफटका मारून आलात, किंवा खेळून आलात. त्यामुळे तुम्हाला तुमचे हात अस्वच्छ दिसत असतील तर साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवा.

कोणीही तुमच्या आजूबाजूला शिंकत असेल

जेव्हा तुमच्या बाजूला बसलेली व्यक्ती शिंकत असेल तर तुम्ही सॅनिटायजरचा वापर करत असाल. पण शिंकल्यामुळे किंवा खोकल्यामुळे होणारं संक्रमण हे श्वासांमार्फत पसरत असतं. म्हणून समोरील व्यक्ती शिंकत असेल तर सतत स्वतःच्या हातांना सॅनिटायजर लावू नका.

कोणत्याही वस्तूला हात लावला नसेल

तुमच्यापैकी अनेकजण सतत सॅनिटायजरचा वापर करत असतील. एका रिसर्चनुसार सतत सॅनिटायजरचा वापर केल्यामुळे किटाणू अल्कोहोलने सहनशील होऊ शकतात. म्हणून गरज असेल तेव्हाच सॅनिटायजरचा वापर करा. तसंच तुम्ही काहीवेळा पूर्वीच हात धुतले असतील तर सॅनिटायजर लावू नका.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *