लता दिदींच्या नि’धनानंतर आता जागा झाला सलमान, पहा अशा अनोख्या पद्धतीने वाहिली श्रद्धांजली..

लता दिदींच्या नि’धनानंतर आता जागा झाला सलमान, पहा अशा अनोख्या पद्धतीने वाहिली श्रद्धांजली..

लता मंगेशकर हे नाव इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधील असलं तरी देशातील प्रत्येक व्यक्ती यांच्या समोर नतमस्तक होते त्याला कारण म्हणजे त्यांचा आवाज. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती ही लता मंगेशकर यांना परिचयाची होती. ५ पिढयांना आवाज देणाऱ्या लता मंगेशकर यांचे काही दिवसांपूर्वी नि’धन झाले. त्यांच्या जाण्याने चित्रपट श्रुष्टीतील एक धगधगत्या युगाचा अंत झाला.

पण आपल्या गाण्यांमधून लता मंगेशकर कायमचा अमर झाल्यात. असे असले तरी त्यांच्या नि’धनाच्या बातमीने संपूर्ण देशवासीयांना मोठा ध’क्का दिला आहे. लता दीदीच्या जाण्यामुळे केवळ आपल्या देशातच नाही तर, जगभरातील संगीत सृष्टीमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हणून तर म्हणतात की, संगीताला कोणत्याहि सीमा नसतात.

त्यांच्या बहिणी सोबत संपूर्ण देशच दुःखाच्या शोकसागरात बु’डाला आहे. लता मंगेशकर या सगळ्या मंगेशकर भावंडांमध्ये मोठा होत्या. लहानपणी त्यांच्यावर जबाबदारी पडल्याने त्यांनी कला क्षेत्रात आपले नाव करण्याचे ठरवले. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी गाण्याला सुरुवात केली. सांगलीमध्ये त्यांनी शिक्षण देखील पूर्ण केल्याचे सांगण्यात येते. म्हणजे मधुबाला पासुन ते आजच्या प्रीती झिंटा पर्यंत सगळ्या अभिनेत्रींना त्यांनी आवाज दिला.

आज संपूर्ण जगाला आपल्या जाण्यामुळे भावुक करणाऱ्या लतादीदीचा सुरुवातीचा प्रवास मात्र अत्यंत खडतर होता. त्यांची पहिली कमाई अवघ्या पंचवीस रु’पयांची होती. सुरुवातीच्या काळात त्यांच्या वाटेल आलेला संघर्ष आणि मेहनत याला लता दीदी कधीच थकल्या नाही आणि अखेरसीस त्या यशस्वी झाल्या. स्वतः सरस्वतीचा आशीर्वाद असणाऱ्या लता दीदीना लवकरच नवी ओळख मिळाली आणि यश त्यांच्या पायाशी लोळू लागलं.

लता मंगेशकर यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी तर झालीच आहे मात्र अनेकांची वैयक्तिक आणि देखील झाली आहे. अनेक दिग्गजांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे त्यात आता सलमानने देखील श्रद्धांजली दिली आहे. त्याने व्हिडीओही शेअर केला आहे.

सलमान खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो लग जा गले हे लता मंगेशकर यांचं गाणं गाताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘लताजींसारखे कोणी नाही आणि कोणीही नसणार.’ सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.