VIDEO : कुत्र्यासारखं सलग ७ तास खड्डा खोदत होता ‘सिंह’, पहा खड्ड्यामधून निघाले असे काही कि बघून चकित व्हाल..

इंटरनेटवर रोज अनेक व्हिडियो अपलोड केले जातात. त्यापैकी काही व्हिडियो खास आपले लक्ष वेधून घेतात. त्यामध्ये काही व्हिडियो बनवताना वेगळा विचार केलेला असतो आणि बनल्यानांतर तो वेगळाच बनतो. खास करून प्राण्यांचे व्हिडियो. सुरुवातीला एक गमतीशीर व्हिडियो म्हणून तो व्हिडियो असतो, आणि अचानक प्राणी असं काही करतात की तो व्हिडियो वेगळाच होऊन जातो.
कधी खूप गं’भीर, केव्हा कधी विचित्र आणि कधी गमतीशीर देखील राहतो. प्राण्यांचे हाव-भाव बघून बऱ्याच वेळा आपल्याला वाटते की, आपण सहजपणे अचूक अंदाज लावू शकतो. मात्र, प्रत्येक वेळी तसं घडत नाही. अनेकवेळा आपल्या घरी असणाऱ्या, पाळलेल्या प्राण्यांच्या बाबतीत देखील अंदाज चुकीचा ठरतो.
असच काही या व्हिडियोमध्ये देखील बघायला मिळत आहे. संबंधित व्हिडियो केनियाच्या नरोबी येथील आहे. येथे एक २४ वर्षीय तरुण सोहेब अल्वी यांनी हा व्हिडियो बनवला आहे. सोहेब यांनी पाहिलं की, जंगलचा राजा असणारा सिंह एका ठिकाणी अगदी कुत्र्यासारखा खड्डा खोदत आहे. बराच वेळ झाला तरीही तो सिंह, त्याच जागी खड्डा खोदत होता.
नेहमी रुबाबात फिरणाऱ्या सिंहाला नेहमीच आपण एखाद्या प्राण्याचा शिकार करताना, पाठलाग करताना पहिले आहे. त्यामुळे हा व्हिडियो जरा वेगळा आहे. सुरुवातीला एक गमंत म्हणून, सोहेब यांनी हा व्हिडियो बनवण्यास सुरुवात केली. एक सिंह कसा कुत्राप्रमाणे खड्डा खोदत आहे बघा, असं कॅप्शन टाकून हा व्हिडियो चांगलाच वायरल होईल असा त्याने अंदाज लावला.
मात्र एक तास झाला, दोन तास झाले तरीही तो सिंह त्याच भागात खड्डा खोदत होता. हे बघून सोहेलच्या मनात कुतुहूल निर्माण झाले आणि त्याने, या सिंहाला नक्की काय करायचे आहे म्हणून बघत राहिला. सलग सात तास खड्डा खोदून झाल्यावर, त्या खड्ड्यामधून एक जंगली रानडुक्कर बाहेर निघून पळू लागले.
अर्थातच सिंहाने त्याला लगेच पकडले आणि त्याचा शिकार केला. हे जंगली रानडुक्कर, इतर प्राण्यांनी बनवलेल्या खड्ड्याचा वापर करुन तासन-तास त्यामध्ये लपून बसतात. स्वतःच्या संरक्षणासाठी ते असे करतात. मात्र, सिंहाने अगदी अचूक खड्डा ओळखला आणि सलग सात तास मेहनत करून आपली शिकार मिळवलीच.
सध्या हा व्हिडियो सगळीकडेच चांगलाच वायरल होत आहे. मनुष्याने कितीही विचार केला तरीही, नकी प्राण्यांच्या डोक्यात काय सुरु आहे हे केवळ त्यांच्या हाव-भावावरून नाही सांगू शकत. सिंहाची खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने बनवलेल्या या व्हिडियोमध्ये, त्याचा चौकसपणा समोर आला. त्याने अचूक शोधून काढले होते की, कोणत्या खड्ड्यामध्ये तो जंगली रानडुक्कर लपून बसला आहे. स्वतःची शिकार बनवण्यासाठी त्याने सलग सात तास खड्डा खोदला, आणि अखेर त्याने आपली शिकार मिळवली.