Rishi Kapoor Death: अभिनेता ऋषी कपूर यांचे निधन : अमिताभ बच्चन म्हणाले- ‘मी खचलो आता’

Rishi Kapoor Death: अभिनेता ऋषी कपूर यांचे निधन :  अमिताभ बच्चन म्हणाले- ‘मी खचलो आता’

बुधवारी बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांपैकी एक असलेल्या इरफान खानने या जगाला निरोप दिला. अशा परिस्थितीत आता आणखी एक मोठी दु: खद बातमी समोर आली आहे.

ऋषी कपूर यांचे निधन झाल्याचे ट्विट अभिनेता अमिताभ बच्चन यांनी केले आहे. सोशल मीडियावर अमिताभ यांचे हे ट्विट येताच चाहते आणि तारकांनी श्रद्धांजली आणि शोक व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.

आज (30 एप्रिल) सकाळी 9.30 वाजता अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘तू निघून गेला .. ऋषी कपूर … तू निघून गेला .. त्यांचे निधन झाले. मी तुटलो आहे. ‘

मंगळवारी प्रकृती बिघडल्यानंतर ऋषी कपूर यांना मुंबईच्या एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी रणधीर कपूर म्हणाले होते, “ते हॉस्पिटलमध्ये असून कर्करोगाशी लढत आहे.

त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशाचप्रकारे फेब्रुवारी महिन्यातही ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

परंतु कर्करोगशी लढत असताना त्यांची झुंज अपयशी ठरली. दोन दिवसात दोन दिगग्ज कलाकार बॉलिवूड ने गमावल्यामुळे सर्वत्र शोकांतिका पसरली आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *