एकदा नव्हे ‘तीनदा’ महाभारतातील द्रोपदीने केला होता खऱ्या आयुष्यात आत्महत्येचा प्रयत्न..!

एकदा नव्हे ‘तीनदा’ महाभारतातील द्रोपदीने केला होता खऱ्या आयुष्यात आत्महत्येचा प्रयत्न..!

सध्या कोरोना महामारीमुळे देशात लोक डाऊन सुरू आहे. यावर उपाय म्हणून सरकारी न्यूज चॅनेल असलेल्या दूरदर्शनने जुन्या मालिका पुन्हा एकदा नव्याने सुरू केल्या आहेत. यामध्ये रामायण-महाभारत, शक्तिमान, चाणक्य यासारख्या मालिकांचा समावेश आहे.

त्यातल्या त्यात रामायण आणि महाभारत सध्या मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा पाहिले जात आहे. महाभारतामध्ये द्रोपदीची भूमिका साकारणाऱ्या रूपा गांगुली यांनी त्यांच्या खर्‍या आयुष्यामध्ये एक नव्हे तब्बल तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याचे कारणही तसेच होते.

काही वर्षापूर्वी दूरदर्शनवर महाभारत ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. त्यावेळी या मालिकेतील एक एक पात्र प्रचंड गाजले होते. यामध्ये विशेष म्हणजे द्रौपदीचे पात्र खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना आवडले होते.

त्यानंतर रुपा गांगुली यांची ओळख सर्वांना झाली होती. या मालिकेनंतर रुपा गांगुली यांनी अनेक चित्रपटात देखील काम केले होते. त्यानंतर रूपा यांनी धुब्रो मुखर्जी याच्यासोबत लग्न केले. त्यामुळे त्या कोलकाता येथे रहाण्यास गेल्या. सुरूवातीला काही वर्ष त्यांचा गुण्यागोविंदाने संसार सुरू होता.

मात्र, त्यांच्यामध्ये त्यानंतर कुरबुरी सुरू झाल्या. लग्नानंतर रूपा घरातच राहू लागल्या होत्या. मात्र, अभिनेत्री असल्यामुळे त्यांना घरात राहणे अस्वस्थ वाटत होते. तसेच पैशाची चणचण असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा काम सुरू केले. मात्र, पतीला हे काम आवडत नव्हते. तरीदेखील त्या काम करू लागल्या आणि सकाळी 9 च्या आधी आणि रात्री दहा नंतर त्यांनी कामकाजाचे फोन घेणेसुद्धा टाळले होते.

तसेच घरातील धुणीभांडी सुद्धा त्यांनी केले. मात्र, पतीची कुरबुर सुरू होती. त्यानंतर त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. अशा वेळेस पतीने त्यांना आर्थिक मदत देखील केली नाही. त्यामुळे त्या नैराश्याच्या गर्तेत गेल्या.

काही वर्षानंतर त्यांना आकाश नावाचा मुलगा झाला. आकाशचा जन्म आधी रूपा यांनी नैराश्यातून झोपीच्या गोळ्या खात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यातून त्या बचावल्या.

आकाशच्या जन्मानंतर देखिल रूपा यांनी दोन वेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे त्यांनी 2009 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते. आता नव्याने महाभारत सुरू झाल्याने ही पोस्ट व्हायरल होत आहे. आता सुखाने आयुष्य जगत असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाभारतातील भूमिका आपल्या आयुष्याची शिदोरी असल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले आहे. पुन्हा नव्याने ही मालिका सुरू झाल्याने आपण पुन्हा एकदा जुन्या आठवणीत गेल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.