रोज सकाळी झोपेतून उठताच फक्त ‘5’ मनुक्यांचे असे करा सेवन, पहा होणारे फायदे असतील ज बरदस्त…

मनुका भारतीय आहारातील एक महत्वाचा घटक आहे. सुकामेवा या वर्गवारीत हा पदार्थ येतो. मनुका खाण्याचे अनेक फायदे आहे. खीर शिरा आणि इतर पदार्थ केल्यानंतर त्यामध्ये मनुका या घालून त्याची चव वाढवता येते. तसेच सजावट वाढीसाठी देखील मनुकाचा मोठा वापर होतो. तसेच आरोग्यासाठी मनुका या अतिशय महत्त्वाच्या आहेत. रोज मनुका खाल्ल्याने अनेक फायदे होत असतात. तर जाणून घेऊया आपण नेमके कुठले फायदे होतात ते.
१. जर तुम्हाला पोटदुखी, जुलाब, त्रास असेल तर तुम्ही रोज मनुकांचे सेवन करावे, असे केल्याने तुम्हाला पोट दुखी आणि जुलाब होत नाही. दुधामध्ये पाच मनुका टाकून दूध घ्यावे. यामुळे पोट दुखीचा त्रास थांबतो.
२. जर तुम्हाला ऍसिडिटी आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही पाच मनुका गरम पाण्यात उकळून मनुका पाणी घ्यावे. यामुळे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होत नाही. तसेच मनुका या थंड प्रवृत्तीची असल्यामुळे पित्त होत नाही.
३.रक्त-दाब : रात्री पाच मनुका या भिजवून ठेवा त्या सकाळी उठल्या उठल्या खाव्या. यामुळे रक्त दाब नियंत्रणात राहतो आणि तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही. त्यामुळे नियमितपणे मानुकांचे सेवन करावे.
४. लोह खनिज मनुकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोहखनिज असतात. त्यामुळे तुम्हाला रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मोठी मदत होते. याचे सेवन नियमित केल्याने तुमची हिमोग्लोबीनचे लेव्हल ही कंट्रोल मध्ये राहते.
५.मनुकामध्ये मोठ्या प्रमाणात ऑंटी एक्सीडेंट असतात, त्यामुळे याचे सेवन केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी मोठी मदत होते. तसेच महिलांनी मनुकांचे नियमितपणे सेवन करावे. यामुळे तुम्हाला मोठा फायदा होतो.