कॅप्टन होताच रोहित शर्माने दिली विराट कोहलीवर पाहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘विराटाचे काम..’

कॅप्टन होताच रोहित शर्माने दिली विराट कोहलीवर पाहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘विराटाचे काम..’

सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठे फेरबदल बघायला मिळत आहेत. क्रिकेट एक असा खेळ आहे, ज्यामध्ये तुमचा फॉर्म चांगला असेल तर सगळीकडेकच तुमचे कौतुक होते. पण जसा तुमचा फॉर्म खराब होतो तुमचे चाहते देखील तुमच्यावर टीका करतात. अशा वेळी आपल्या मित्रांची साथ देखील खूप महत्वाची असते.

आपल्यासोबत खेळणारे खेळाडू, आपल्याला कशी साथ देतात, हे देखील महत्वाचे ठरते. तर ज्यांच्याकडे महत्वाचे सूत्रे आहेत, त्यांची आपल्या सह-खेळाडूंसोबत कशी वागणूक आहे हे संघासाठी महत्वाचे असते. सध्या टीम इंडियामध्ये मोठे फेरबदल होत आहेत. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची सूत्रे आता रोहित शर्मा (Rohit Sharma) कडे सोपवण्यात आले आहेत.

त्यामुळे आता विराट कोहली (Virat Kohli) व त्याच्या नात्यामध्ये कोणता फरक बघायला मिळतो व त्याचा परिणाम खेळावर होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थतीमध्ये आता टीम इंडियाचा कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माने, विराट कोहली बद्दल प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीचा एक बॅट्समॅन म्हणून असलेला दर्जा अद्वितीय आहे.

सोबतच त्याच्या नेतृत्त्व कौशल्याची देखील नक्कीच टीमला गरज आहे, असे मत रोहितने व्यक्त केले आहे. मैदानावरील कॅप्टनचे काम हे केवळ २० टक्केच असते. बाकी ८० टक्के काम हे रणनीती तयार करण्याचेच असते, असे रोहितने सांगितले. सोबतच प्रत्येक कॅप्टनची इच्छा असते की, आपले खेळाडू आयसीसी स्पर्धेच्या कोणत्याही मोठ्या लढतीमध्ये निर्णायक परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेहमीच तैयार असावेत, असे मत देखील यावेळी रोहितने व्यक्त केले.

‘विराट कोहलीसारखा सर्वोत्तम बॅट्समॅन नेहमीच संघासाठी आवश्यक आहे. टी20 आणि वनड-डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी अगदी जबरदस्त आहे. अनेकवेळा टीमला संकटातून बाहेर काढन्यात विराटचा खारीचा वाटा आहे. सर्व खेळाडू चांगलं खेळत आहेत, ही खबरदारी घेण्याचे काम कॅप्टनचे असते. त्याला योग्य समन्वय आणि रणनीती तयार करण्यावर भर द्यावा लागतो.

कॅप्टनने आपल्या प्रदर्शनातूनच बोललं पाहिजे. मला दिलेल्या जबाब्दारीनुसार, माझे बहुतेक काम हे मैदानाच्या बाहेर असेल. खेळाडूंवर जबाबदारी सोपवणे आणि त्यांनी मैदानात ती पूर्ण करावी, आता यासर्वांची काळजी मला घ्यायची आहे. तुमच्याकडे मैदानात तीनच तास असतात, आणि त्यामध्ये तुम्ही फार काही करू शकत नाहीत.

कारण, मैदानात ११ खेळाडू खेळत असतात.’ अस देखील रोहित म्हणाला. ‘चॅम्पियन्स ट्रॉफी सोबतच २०१९ साली झालेला वर्ल्ड कप आणि अगदी यंदाचा वर्ल्ड कप या तीन्ही स्पर्धेत आम्ही मॅचच्या पहिल्याच टप्प्यात पराभूत झालो. या विषयाची मी खास खबरदारी घेणार आहे. अगदी खराब परिस्थितीचा सामना करण्यासाठी देखील आम्ही कायम सज्ज राहिले पाहिजे.

३ आऊट १०या परिस्थितीमधून सुद्धा टीमला बाहेर पडता यायलाच हवे. ३ आऊट १० असा स्कोअर असेल तर १८० किंवा १९० रन होणार नाहीत, असे कुठे लिहिलं आहे का? त्यामुळे, या पद्धतीनं टीमची तयारी व्हावी अशी माझी इच्छा आहे.’ असे एका प्रश्नाचे उत्तर देताना रोहितने सांगितले.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *