रिया चक्रवर्ती ची कॅलिंग रिपोर्ट आली समोर ‘या’ व्यक्तीला एका दिवसात केले होते 800 कॉल

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आ*त्म*ह*त्येप्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीत अडकली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) तपास सुरू केला आहे. आता सुशांतची माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी हिला रियाने मागील सहा महिन्यांत तब्बल आठशे कॉल केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
ईडीने या प्रकरणी कर चुकवेगिरीचा गुन्हा दाखला केला आहे. रियाचे चार्टर्ड अकाउंटंट रितेश शाह आणि संदीप श्रीधर यांची चैाकशीही ईडीने केली होती. सुशांतच्या आ*त्म*ह*त्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत.
हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत.
सुशांतच्या आ*त्म*ह*त्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे.
सुशांतची आ*त्म*ह*त्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह पाच जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, श्रुती मोदी यांचा समावेश आहे.
एका वृत्तवाहिनीने रियाचे मागील सहा महिन्यांतील कॉल डिटेल्स मिळवले आहेत. यानुसार, रियाने मागील सहा महिन्यांत श्रुती मोदी हिला तब्बल 800 कॉल केले होते. याचबरोबर सुशांतच्या हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांना रियाने मागील सहा महिन्यांत 300 कॉल केले आहेत. याचबरोबर तिने अनेक वेळा दिग्दर्शक महेश भट्ट यांनाही कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सुशांत याने 14 जूनला मुंबईतील घरी ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली होती. त्याने आ*त्म*ह*त्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आ*त्म*ह*त्येमागे नै*रा*श्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का?
याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.