रात्री झोपायच्या आधी चकूनही करू नका या ‘५’ चुका, नाहीतर भोगावे लागतील मोठे परिणाम

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना कामावर जावे लागते. यातूनही आराम नाही भेटला तर अनेकांची चिडचिड झाल्याचे पाहायला मिळते. चांगली झोप सर्वांसाठीच आवश्यक असते. मात्र, दिवसभर आपण काम केल्यानंतर रात्री घरी आल्यावर जेवण करून झोपण्यासाठी पलंगावर गेल्यावर आपण काही वेगळे काम केले तर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
म्हणजेच आपण झोपण्याच्या वेळेस गेले तर झोपायला पाहिजे. मात्र, आपण काहीतरी वेगळेच काम करत असतो. असे केल्यामुळे तुमची रात्रीची झोप खराब होऊन तुम्हाला झोपच येणार नाहीतर आम्ही आपल्याला असेच कारणे या लेखामध्ये सांगणार आहोत.
१.मोबाईल लॅपटॉपचा वापर: आजकाल अनेकजण हे मोबाईल शिवाय एक मिनिटसुद्धा राहू शकत नाहीत. कामावरून घरी आल्यानंतर झोपायला गेल्यानंतर अनेकजण लॅपटॉप आणि लॅपटॉपमध्ये पहात बसतात. त्यामुळे त्यांची झोप उडून जाते. झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा लॅपटॉप पाहत असाल तर यामध्ये तातडीने बदल करा आणि वेळेवर झोपा. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
२.व्यायाम: अनेक जण झोपण्यापूर्वी व्यायाम करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे अजिबात करू नका. व्यायाम केल्यामुळे झोपल्यावर याचा परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला व्यायाम कराय चा असेल तर झोपण्याआधी एक तास व्यायाम करा. त्यानंतर तुम्हाला रात्री चांगली झोप येईल.
३.झोपताना टीव्ही पाहणे: आजकाल अनेक जण झोपतना टीव्ही पाहत असतात. मात्र, असे चुकून करू नये. आपण एखादा चित्रपट पाहत असतो त्यामुळे आपल्याला पूर्ण पहावा वाटतो. त्यामुळे तुम्ही जागे राहता आणि परिणामी तुम्हाला रात्रभर झोप येत नाही. यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रात्री झोपताना टीव्ही न पाहणे कधीही चांगले.
४.खोलीचे तापमान : आपण ज्या खोलीमध्ये झोपता त्या खोलीचे तापमान किती आहे याबाबतही आपण तपासणी करावी. तापमान जर अधिक झाले असेल तर याचा आपल्या झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे खोलीचे तापमान हे मर्यादेपर्यंत ठेवावे. त्यानंतर आपल्याला चांगली झोप येईल.
५.वाचन करून झोपणे: अनेक लोकांना वाचन करत करत झोपण्याची सवय असते. मात्र, असे करू नये, याचा तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. झोपताना जर आपण वाचन केले तर आपल्या डोक्यामध्ये तेच विचार राहतात आणि त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असा दावा अनेकांनी केला आहे. त्यामुळे झोपण्याच्या पूर्वी आपण एक तास आधी वाचन करावे.