रात्री सतत लघवीला येत असेल तर तुम्हालाही असू शकतो ‘हा’ आजार; जाणून घ्या उपाय

रात्री सतत लघवीला येत असेल तर तुम्हालाही असू शकतो ‘हा’ आजार; जाणून घ्या उपाय

रात्री लघवीला जाण्याची सवय अनेकांना असते. सगळेचजण रात्री झोप आल्यानंतर एकदा किंवा दोनदा लघवीला जातात. पण ४ ते ५ वेळा किंवा त्यापेक्षा जास्तवेळा जर तुम्ही लघवीला जात असाल तर शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर याचा परिणाम होऊ शकतो किंवा तुम्हाला एखादा आजार सुद्धा असू शकतो. आज आम्ही तुम्हाला या समस्येची लक्षणं आणि उपाय सांगणार आहोत.

रात्री सतत लघवी येण्याची अनेक कारणं आहेत. मुत्राशय अधिक सक्रिय असल्यामुळेही असा त्रास उद्भवू शकतो. जे लोक डायपबिटिसचे शिकार आहेत त्यांना रात्री सतत लघवीला जावं लागतं.

या स्थितीत शरीरातील साखरेचं प्रमाण वाढत जातं. यूरीनल ट्रॅक्ट इंफेक्शनमुळे लघवी करताना जळजळ आणि सतत लघवी येण्याचा त्रास उद्भवतो. याशिवाय किडनीत कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल तर किंवा प्रोटेस्ट ग्रंथींमध्ये वाढ झाल्यास लघवी येते.

उपाय

सतत लघवी येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, रक्ताची आणि मुत्राची तपासणी करून घ्यावी, रोज व्यायाम करायला हवा, प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता चांगली करावी, डायबिटीस तपासून घ्यावे, लघवी जास्तवेळ थांबवून ठेवून नये, झोपण्याआधी चहा, कॉफी, मद्य असे पदार्थ पिणे टाळावे.

जळजळ होणे, लघवीला जास्त दुर्गंध येणे ओटीपोटात दुखणे ही मूत्राशयाच्या आजाराची लक्षणे आहे. त्यामुळे अशक्तपणा, ताप, पाठीचे दुखणे, मानसिक तणाव व वजन कमी होणं.

आदी समस्या निर्माण होतात, महिलांना मुत्रमार्ग लहान असल्यामुळे अशा समस्येचा सामना करावा लागू शकतो. अशी स्थिती उद्भवल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *