‘लग्न होणारच होतं पण’…; रतन टाटांनी सांगितली त्यांची Love Story !

रतन टाटा भारतीय उद्योग क्षेत्रात अढळस्थानी चमकत राहणारा तारा. टाटांविषयी आजवर आपण अनेक किस्से ऐकलं असेल. या माणसाबद्दल कितीही लिहावे तेवढे कमीच आहे. आज आम्ही आपल्याला टाटांच्या जीवनातील एका अशा पैलू सांगणार आहोत.
याबाबत कुठेही उल्लेख झालेला नाही. होय, रतन टाटा एका मुलीच्या प्रेमात पडले होते. हाच किस्सा आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
रतन टाटा अब्जावधी रुपयांच्या टाटा समूहाचे मालक. देश-विदेशात त्यांच्या अनेक कंपन्या आहेत.
मात्र, रतन टाटा हे अजूनही अविवाहित आहेत. त्यांचे वय सध्या 80 च्या आसपास आहे. फेब्रुवारी महिन्यात एका फेसबुक पेजवरून टाटाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच माहिती शेअर करण्यात आली होती. त्यांचे आई-वडील बहीण आणि इतरांबद्दल माहिती देण्यात आली होती. तसेच त्यांनी लग्न का केले नाही ? याबाबतही खुलासा करण्यात आला होता.
रतन टाटा यांनी लॉस एंजेलिस येथून आर्किटेक्चरची पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणही घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टाटा तिथेच एका कंपनीत नोकरी करू लागले.
या वेळी त्यांच्या सहवासात एक मुलगी आली होती. दोघांची पुढे चांगली मैत्री झाली. दोघेही नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, त्यानंतर अशा काही घडामोडी घडल्या की ही प्रेमकहाणी अधुरी राहिली. याचे दुःख टाटा यांना वाटत असेल की नाही ते माहित नाही.
आजवर त्यांनी याबाबत कधीही कुठे सांगितले नाही. मात्र, काही पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल होत असून त्यातून ही बाब समोर येत आहे.
चीन युद्धाचा परिणाम
रतन टाटा यांचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. ते लग्न देखील करणार होते. मात्र, त्याच वेळी रतन टाटा यांच्या बहिणीची प्रकृती बिघडल्यामुळे ते भारतात आले. त्यानंतर भारत चीन युद्ध सुरू झाले. हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नव्हते. त्याच वेळी संबंधित मुलीच्या पालकांनी या लग्नास विरोध केला. कारण चीन आणि भारत यामध्ये युद्ध सुरू होते. याचाच परिणाम म्हणून टाटा यांना लग्न करण्यास त्या मुलीने नकार दिला. त्यानंतर टाटा आयुष्यभर अविवाहित राहिले.
आजीने केला सांभाळ
रतन टाटा यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर ते सैरभैर झाले होते. त्यांचे बालपण अतिशय चांगले गेले. मात्र, आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याने ते व्यथित झाले होते. त्यानंतर टाटा यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. आयुष्याची मूल्य आजीने त्यांना शिकवली, असेही समाज माध्यमावर सांगण्यात येते.
कोरोना संकटासाठी दिले दीड हजार कोटी
रतन टाटा यांचे देशासह जगभरात मोठे नाव आहे. टाटा ब्रँडच्या अनेक गाड्या आज बाजारात आहेत. टाटा जसे आपल्या कर्मचाऱ्यांबाबत हळवे आहेत. तसेच देशाबाबतही हळवे आहेत. टाटा यांनी अनेकदा देशावर संकट आल्यानंतर कोट्यवधी रुपये मदतनिधी दिला आहे.
सध्या देशात कोरोना महामरीचे संकट असल्याने रतन टाटा यांनी खुल्या मनाने समोर येत तब्बल दीड हजार कोटी रुपयांची मदत केली. टाटा यांचे दातृत्व एवढ्यावरच थांबत नाही. या पुढेही काही लागले तर आपण मदत करण्यास थांबणार नाही, असे ही ते म्हणाले आहेत.