राम कपूर आणि साक्षी तंवरच्या त्या १७ मिनटाच्या इंटिमेट सिनने पूर्ण टीव्ही क्षेत्रात माजवली होती खळबळ !

काही वर्षांपूर्वी चित्रपटांमध्ये बोल्ड सीन देणे हे खूप गंभीरपणाचे मानले जात असे. बोल्ड सीन्स देण्यावर सेन्सॉर बोर्डची कात्री असे. बोल्ड सीन्सनुसार चित्रपटाला सर्टिफिकेट मिळते. मात्र, गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये किसिंग सीन आणि बोल्ड सीनची मोठ्या प्रमाणात चलती असल्याचे पाहायला मिळते.
हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या दहा वर्षापासून तर हे प्रमाण खूपच वाढत आहे. 2000 नंतर असे चित्रपट मोठ्या प्रमाणात येत आहेत. काही वर्षांपूर्वी मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मीच्या मर्डर या चित्रपटाने सर्व सीमा मोडून टाकल्या होत्या.
या चित्रपटात मल्लिका हिने अनेक बोल्ड सीन देऊन सर्वांना चकित केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड चालला होता. त्यानंतर मल्लिका हिच्याकडे चित्रपटासाठी मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. या चित्रपटावर काही जणांनी टीकाही केली.
तसेच काही संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला. मात्र, हा चित्रपट खूप चालला. काही वर्षात तर प्रत्येक चित्रपटात एक किसिंग सीन दाखवलाच जातो. यामध्ये आघाडीची अभिनेत्री आणि अभिनेत्री देखील मागे राहत नसल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते.
हाच ट्रेंड आता वेब सिरीजच्या माध्यमातून देखील येत आहे. वेब सिरीजमध्ये तर मोठ्या प्रमाणात हॉट दृश्य चित्रित होत आहेत. वेब सिरीजमध्ये कुठल्याही प्रकारचे सेन्सॉर नसल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात बोल्ड आणि किसिंग सीन वापरल्या जातात.
तसेच हा ट्रेंड आता मालिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मालिकांमध्ये अशी गाणी चित्रीत होण्याचा होण्याचा ट्रेंड अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी आलेल्या एका मालिकेतील इंटीमेट सीनने खळबळ उडवून दिली होती.
या मालिकेचे चाहते मोठ्या प्रमाणात देशात होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आम्ही आपल्याला या मालिकेबद्दल सांगणार आहोत.
एकता कपूर हे टेलिव्हिजन क्षेत्रातले खूप मोठे नाव आहे. एकता कपूरने आजवर अनेक मालिकांची निर्मिती केली आहे. तसेच तिने मराठीत देखील मालिका केल्या आहेत. यानंतर तिने अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. तिची बालाजी टेलिव्हिजन निर्मिती संस्था खूप मोठ्या प्रमाणात छोट्या पडद्यावर काम करते.
अलीकडेच तिने मराठीत देखील काही प्रयोग करून पाहिले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर बडे अच्छे लगते हे ही मालिका आली होती. या मालिकेने खूप मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. मात्र, या मालिकेत एक असा सीन चित्रीत करण्यात आला होता की त्याने सर्वांची झोप उडवून टाकली होती. त्यानंतर या मालिकेवर अनेकांनी टीका देखील केली होती.
17 मिनिटांचा हॉट सीन…
एकता कपूर हिने काही वर्षांपूर्वी बडे अच्छे लगते है ही मालिका तयार केली. या मालिकेत राम कपूर आणि साक्षी तन्वर यांची भूमिका होती. मालिका ही कौटुंबिक स्वरूपाची असली तरी यात प्रचंड रोमांच होता. या मालिकेत सुरुवातीला साक्षी तन्वर, राम कपूर यांचे अजिबात पटत नसते.
मात्र, त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होतात. त्यानंतर या दोघांवर 17 मिनिटांचा इंटीमेट सीन तयार करण्यात आला होता. हा प्रचंड गाजला होता. तसेच तेवढाच खळबळ माजून गेला होता. हा सीन पाहिल्यानंतर मालिकेवर अनेकांनी टीका केली होती.
तसेच एकता कपूर देखील टीका करून तिला पत्र लिहिले होते. ही मालिका अनेक घरात एकत्र बसून पाहिल्या जात होती त्यामुळे अचानक हा सीन सुरू झाल्याने अनेकांची गोची झाली होती. लहान मुलांसमोर हा प्रकार घडल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला होता.
त्यानंतर या मालिकेच्या निर्मात्यांनी आपण असा सीन घेऊन चूक केल्याचे म्हटले होते. त्यानंतर या दोघांनी करले तू भी मोहब्बत या वेब सिरीजमध्ये देखील एकत्र काम केले होते.