धोनीसोबत असलेल्या संबंधाचा आजही पच्छाताप करतेय ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली, आजही ‘हा’ काळा डाग..

धोनीसोबत असलेल्या संबंधाचा आजही पच्छाताप करतेय ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली, आजही ‘हा’ काळा डाग..

एम एस धोनी हा देशातील अनेक क्रिकेटपटूंच्या अगदी जवळचा आणि खास विषय आहे. करियरच्या सुरुवातीपासूनच धोनीने चांगलीच चर्चा रंगवली होती. आपल्या खेळामुळे असेल किंवा वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत असणाऱ्या नात्यामुळे असेल, धोनी कायमच चर्चेत असायचा. त्याचे नाव अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्स सोबत जोडण्यात आले होते.

दीपिका पदुकोण आणि धोनी या दोघांमध्ये देखील काही सुरु आहे, अशा चर्चाना उधाण आले होते. मात्र त्यावेळी त्या अ’फवा होत्या हे लवकरच समोर आले. कारण दीपिका त्यावेळी धोनीला नाही तर युवराज सिंगल डेट करत होती, असं सांगितलं जात. त्यानंतर प्रीती सिमोस, असीन आणि राय लक्ष्मी या अभिनेत्रींसोबत देखील धोनीचे अफेअर असण्याची चर्चा रंगली होती.

यापैकी नक्की कोण धोनीसोबत नात्यामध्ये होते याबद्दल कोणीही उघडपणे बोलले नाही. पण नुकतेच अभिनेत्री राय लक्ष्मी हिने आपल्या रिलेशनशिपबद्दल उघडपणे बोलले आहे. केवळ साऊथमध्येच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील आपल्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घालणाऱ्या राय लक्ष्मीचे कधी-काळी धोनीसोबत रिलेशन होते.

२०१० मध्ये धोनीने साक्षी सोबत लग्न केले. पण त्याआधी राय लक्ष्मी आणि धोनी २००८-२००९ मध्ये एकमेकांना डेट करत होते. याबद्दल धोनीने कधीही उघडपणे काहीच बोलले नाही. पण २०१४मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राय लक्ष्मीने आपल्या आणि धोनीच्या नात्याबद्दल उल्लेख केला होता. राय लक्ष्मीच्या सांगण्यानुसार २००८च्या आयपीएल स्पर्धांच्या दरम्यान तिची आणि धोनीची भेट झाली होती.

त्याच दरम्यान त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. बराच काळ त्या दोघांनी एकमेकांना डेट केले होते. मात्र त्यानंतर हळूहळू त्या दोघांमध्ये वाद सुरु झाले. ‘आमच्यातील वाद कमी होतच नव्हते. ते सतत वाढतच चालले होते. म्हणून आम्ही दोघांनी एकत्र येऊन, वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघांनी ब्रेकअप केले.

पण हे ब्रेकअप माझ्यासाठी खूप जास्त महागात पडले. माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक म्हणजे धोनीसोबतच माझं नातं आहे. माझ्या प्रतिमेला लागलेला एक कलंक, एक डाग आहे. कारण कित्येक वर्षांनंतर देखील ते नाते माझी पाठ सोडतच नाहीये. धोनीचे लग्न झाले असले तरीही, आजही मला आमच्या नात्याबद्दल प्रश्न विचारले जातात. धोनी नंतर मी तीन जणांना डेट केले. पण तरीही त्याचा उल्लेख होतच नाही.’ असं राय लक्ष्मी तिच्या आणि धोनीच्या नात्याबद्दल म्हणाली होती.

धोनी नंतर राय लक्ष्मी, क्रिकेटर आणि बॉग बॉस विनर श्रीशांत सोबत देखील नात्यामध्ये होती. त्या दोघांच्या नात्याच्या चर्चा देखील चांगल्याच रंगल्या होत्या. अकिरा या सिनेमामधून राय लक्ष्मीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र त्याआधी तिने अनेक साऊथच्या सिनेमामध्ये काम केले आहे. राय लक्ष्मी लवकरच झाँसी आयपीएस या कन्नड सिनेमामध्ये झळकणार आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.