भारतात पहिल्यांदा लाँन्च झाली Sport Electric Car ! किंमत आणि फीचर्स पाहून चकित व्हाल…

भारतात पहिल्यांदा लाँन्च झाली Sport Electric Car ! किंमत आणि फीचर्स पाहून चकित व्हाल…

सध्या आपल्या देशामध्ये, वेगवगेळ्या आणि महागड्या गाड्या लाँन्च होत आहेत. स्पोर्ट्स कारचा तर आपल्या देशात देखील मोठा चाहतावर्ग आहे. अनेकांना स्पोर्ट्स कार स्वतःकडे आकर्षित करतात. वाढते प्रदूषण बघता, सध्या गाड्या बनवणाऱ्या कंपनी देखील आता इलेकट्रीक गाड्या बनवण्यावर भर देत आहेत.

माघील बऱ्याच काळापासून, पोर्श कंपनीने भारतात कोणती नवीन गाडी लाँन्च केली नव्हती. त्यामुळे, त्यांची नवीन कार लाँन्च होण्याची अनेकजण वाट बघत होते. आता ती पूर्ण झाली आहे आणि पोर्श टायकन EV अखेर भारतात लाँच झाली आहे. या इलेकट्रीक कारची भारतामध्ये तब्ब्ल दीड (१.५)कोटी किंमत आहे.

पोर्श ची ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार निवडक जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे. Porsche Taycan EV हि गाडी आपल्या, कामगिरीसाठी आणि आकर्षक डिझाइनसाठी जगभरात ओळखली जाते. ही इलेक्ट्रिक कार बॅटरीवर चालते आणि ही पोर्शची सर्वात वेगवान कार आहे. क्षणांत, कित्येक किलोमीटरचे अंतर ही गाडी पार करू शकते.

Porsche Taycan EV या गाडीचे चार मॉडेल भारतामध्ये लाँन्च करण्यात आले आहेत. Taycan, Taycan 4S, Turbo आणि Turbo S असे हे चार मॉडेल्स आहेत. सोबतच Porsche Taycan EV Cross Turismo 4S, Turbo आणि Turbo S अशा दोन व्हर्जनमध्ये सादर करण्यात आली आहे.

Porsche Taycan Turbo S कार तिच्या जबरदस्त परफॉर्मन्समुळे चांगलीच चर्चेत आहे. ही पोर्शची सगळ्यात जास्त शक्तिशाली स्पोर्ट्स कार आहे. ही कार 761 PS इतकी जास्त पॉवर जनरेट करते. आणि म्हणून केवळ 2.8 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते.

यासोबत, Taycan Turbo S Cross Turismo कारला 761 PS ची पॉवर मिळते, त्यामुळे केवळ 2.9 सेकंदात 0 ते 100Km/H पर्यंत वेग ती गाडी पकडू शकते. रेंज बद्दल बोलायच झालं तर, पोर्श मधील एंट्री-लेव्हल Taycan EV रियर व्हील ड्राइव्हमध्ये, केवळ एका चार्जवर 484 किमी पर्यंतची रेंज देते. WLTP नुसार, ही रेंज परफॉर्मन्स बॅटरी रेंज मध्ये उपलब्ध आहे.

यासह, स्टँडर्ड सिंगल DAC 79.2 kWh कार्यक्षमता बॅटरीसह एंट्री लेव्हल मॉडेल 300kW (408 PS) पर्यंतच्या ओव्हरबूस्ट मोडसह ऑफर केले जाते, जे 350kW (476 PS) पर्यंत वाढवता येते. या सोबतच ही कार 2-DAC 93.4 kWh परफॉर्मन्स बॅटरी प्लस पर्यायासोबत सादर केली आहे.

पोर्श कंपनीचे असे म्हणणे आहे की, Taycan Cross Turismo गाडी परफॉर्मन्स आणि रेंज यांच्यामधील परिपूर्ण संतुलन देते. यासोबतच, Porsche ची Taycan 4S Cross Turismo इलेक्ट्रिक कार 490 PS आणि 571 PS ओव्हरबूस्ट मोडला सपोर्ट करते. या गाडीचा टॉप स्पीड 240 kmph इतका जास्त आहे आणि 100 kmph चा स्पीड अवघ्या 4.1 सेकंदात पकडते. Porsche ने भारतात या EV सह अपडेट केलेले Macan सुद्धा लॉन्च करण्यात आले आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत भारतामध्ये 83 लाख रुपये इतकी असणार आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *