पितृपक्षात कावळ्यानाच का मानतात पितरांच प्रतीक, जर कावळ्याने अन्नपदार्थ खाऊन गायीच्या पाठीवर आपली चोच रगडली तर….

कावळा याला कुणी पवित्र तर कुणी अपवित्र मान्यता. मात्र, कावळ्यांनी जर मनात आणले तर काही देखील करू शकतो. काही दिवसापूर्वी शिर्डीमध्ये अशीच एक घ’टना घ’डली होती. एका कुटुंबाला त्या कावळ्याच्या टोळीने जायबंदी केले होते. कावळे या कुटुंबाला घराच्या बाहेर येऊ देत नाही.
याचे कारण म्हणजे या कुटुंबाकडून कावळ्याच्या पिल्ल्याचा मृ’त्यू झाला होता. त्यामुळे आठ दिवस कावळ्याच्या या कुटुंबाने घराच्या बाहेरच येऊ दिले नाही. बाहेर निघाल्यावर ते चोच मारून त्यांना घायाळ करायचे, तर दुसरीकडे पितृपक्षामध्ये कावळ्यांना हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचे स्थान दिले गेलेले आहे.
त्याला काही धार्मिक कारणे देखील आहे. आपण पि्तृपक्षाला कावळ्यांसह, गायीला जेवन घालतो. त्यावेळी त्यात 33 कोटी देवांचा वास असल्याने ते कार्य फार पवित्र मानले जाते, अशी धार्मिक मान्यता आहे. पितृपक्षामध्ये कावळ्यानाच जेवण देण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. याला काही धार्मिक आणि ऐतिहासिक कारण देखील आहेत.
आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये याबाबतची माहिती देणार आहोत. धार्मिक मान्यतेनुसार कावळ्याला देवाचा पुत्र मानण्यात येते. रामायणामध्ये कावळ्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. तसेच याचे वेगवेगळे कारण देखील आहेत.
धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा इंद्रपुत्र जयंत याने कावळ्याचे रूप धारण करून सीतेच्या पायाला जखम केली होती तेव्हा प्रभू रामाने ब्रह्मस्त्राने कावळ्याचे डोळे फोडले होते. तेव्हापासून कावळ्याला अन्नदान हे केले जाते. हे पुण्याचं काम आहे असे मानतात. तसेच कावळ्याला जेवण दिल्याने आपले पितर आपल्यावर खुश होतात, अशीही समाज मान्यता आहे.
तसेच कावळ्याने जर अन्नपदार्थ खाऊन गाईच्या किंवा म्हशीच्या पाठीवर चोच मारली तर, आपले कार्य हे सत्कारणी आणि योग्य झाल्याचे आपण समजावे. अनेकदा एखाद्या व्यक्तीचा मृ’त्यू झाला असल्यास दहा दिवसानंतर अकरावा बारावा तेरावा असे दिवस करण्यात येतात. या दिवसांमध्ये गंगेच्या ठिकाणी धार्मिक विधी देखील पार पडण्यात येतो, तर याच वेळी पिंडदान देखील करण्यात येते.
कावळ्याला यावेळेस अन्न खाऊ घालण्यात येते. जर कावळ्याने तात्काळ पिंडाला शिवले तर मृ’त आ’त्मा हा मुक्त झाला, असे समजण्यात येते. मात्र, काही वेळेला पिंडाला कावळा शिवत नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला ताटकळत थांबावे लागते. मात्र, अनेक ठिकाणी कावळे हे आता नदीकाठी येत नसल्याने हा प्रश्न देखील ऐरणीवर आल्याचे दिसत आहे. एकूणच पितृपक्षामध्ये कावळ्याला अन्न देणे ही अतिशय धार्मीक आणि पवित्र काम असल्याचे सांगण्यात येते.