पायांच्या भेगांवर करून पाहा हे घरगुती उपाय..होतील कायमस्वरूपी मऊ

पायांच्या भेगांवर करून पाहा हे घरगुती उपाय..होतील कायमस्वरूपी मऊ

पायाला भेगा पडणे सामान्य गोष्ट आहे. मात्र यामुळे पायांना त्रास होतो. हिवाळा असो की उन्हाळा पायाला भेगा पडतच असतात. त्यामुळे पायाची काळजी घेणे गरजेचे आहे. पायाची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय…

1. झोपताना पाय स्वच्छ धुवून हर्बल डेव्हलपर क्रीम लावल्यास त्वचा मऊसर होऊन भेगांचा त्रास कमी होतो.

2. कडूलिंबाचा पाला कुटून, रस काढून पायांना लावल्यास भेगा कमी होतात.

3. लोणी, आंबेहळद आणि मीठ हे तिन्ही एकत्र करून रोज पायांना लावल्यास आराम पडतो.

4. बोरिक पावडर, जैतून तेल, व्हॅसलिन हे एकत्रित करून भेगांमध्ये भरावे.

5. चंदन उगाळून लेप लावल्यासही भेगा कमी होतात. ग्लिसरिन, गुलाबपाणी, लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालीश केल्यास भेगा कमी होतात.

6. हळदीमध्ये कोमट तेल टाकून ते मिश्रण भेगांमध्ये भरल्यासही हा त्रास कमी होतो.

7. भेगा पडू नयेत, यासाठी अंघोळ करताना रोज पायांचे तळवे प्युमिक स्टोनने घासावेत.

8.आठवड्यातून एकदा बदाम आणि तिळाचे तेल समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालीश करावे.

9.घरातही चप्पल वापरावी. बाहेर पडताना तळपायाचा मातीशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. या सर्व उपायांनी पायांचे सौंदर्य जपणे सहज शक्य आहे.

Themaharashtrian

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *