हिवाळ्यात नियमितपणे गूळ खाण्याचे ‘हे’ आहेत ‘5’ फायदे

हिवाळ्यात नियमितपणे गूळ खाण्याचे ‘हे’ आहेत ‘5’ फायदे

बर्‍याचदा लोकांना जेवण झाल्यानंतर गोड खाण्याची आवड असते. परंतु काही लोक आरोग्याशी संबंधित असल्याने गोड पदार्थ खाणे टाळतात. परंतु आपल्या आरोग्याशी तडजोड न करता जर आपल्याला गोड खायचे असेल तर गुळ हा एक स्वस्थ आणि उत्तम पर्याय असू शकतो. प्राचीन काळापासून लोक गुळाचा वापर करत आहेत. भारतीय संस्कृतीत गुळाचे स्वतःचे महत्त्व आहे.

साखर आणि गूळ हे दोन्ही उसाच्या रसापासून बनविलेले असतात. परंतु साखर बनवताना त्यात लोह घटक, पोटॅशियम सल्फर, फॉस्फरस आणि कॅल्शियम इत्यादी नष्ट होतात. पण हे गुळासोबत होत नाही. गुळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी असते. एका संशोधनानुसार गुळाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्तता मिळते. चा जाऊन घेऊया गूळ खाण्याच्या काही महत्त्वपूर्ण फायद्यांविषयी…

आपल्या शरीरासाठी गुळाचे अनेक फायदे आहेत. तोंडाच्या चवीपासून ते शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी गूळ उपयोगी असतो. गुळाचे नियमित सेवन केल्याने आपल्याला अनेक फायदे होतात.

जर आपण हिवाळ्याच्या काळात नियमितपणे गूळ खात असाल तर ही सवय आपल्या आरोग्यासाठी फायदेशीरच आहे. चला, जाणून घेऊया घ्या हिवाळ्यात गूळ खाण्यामुळे तुम्हाला काय फायदा होईल –

1) गूळाचा प्रभाव हा गरम असतो, म्हणून हिवाळ्यात गुळाचे सेवन आपल्याला उबदारपणा देण्यासाठी एकदम प्रभावी आहे. हिवाळ्यात दररोज गुळाचे सेवन केल्याने आपले सर्दी, खोकला आणि सर्दीपासून संरक्षण होते.

2) हिवाळ्यामध्ये सामान्यत: रक्तसंचरण खूप मंद असते. परंतु गुळाचे नियमित सेवन केल्यास रक्तसंचरण अधिक चांगले राखण्यास मदत होते. तसेच रक्तदाब समस्यांमध्ये देखील फायदेशीर आहे.

3) या दिवसात घसा आणि फुफ्फुसांचा संसर्ग फार लवकर पसरतो. गुळाचे सेवन केल्याने ते टाळण्यास आपल्याला खूप मदत होते. गुळाचा वापर सर्दी आणि संसर्गाच्या औषधांमध्ये केला जातो.

4) पाचनच्या संबंधित समस्याच्या उपचारात गुळाचे सेवनही फायदेशीर ठरते. जेवणानंतर थोडा गूळ खाल्ल्याने तुमची पचनशक्ती आणखी चांगली होते.

5) गूळ मॅग्नेशियमचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. गूळ खाल्ल्याने स्नायू, नसा आणि रक्तवाहिन्यांचा थकवा दूर होतो. आणि तसेच गूळ अशक्तपणा दूर करण्यात देखील खूप उपयुक्त आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *