मुळशी पॅटर्न चित्रपटातील ह्या अभिनेत्रीच नुकतंच झालं शाही थाटात लग्न..

बऱ्याच कमी लोकांना हे माहित असेल कि मराठी चित्रपट मुळशी पॅटर्न मधील अभिनेत्री “मालविका गायकवाड” हि बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या आहे. मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटातून अभिनेत्री मालविका गायकवाड ने महत्वाची भूमिका बजावली होती. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना मालविका गायकवाड हिने साकारलेला हा पहिलाच मराठी चित्रपट आणि याच चित्रपटामुळे तिला अमाप प्रसिद्धी देखील मिळाली. मालविका ही बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या. पुणे हे तिच्या आईचे माहेर आणि आजोळ. लग्न होऊन त्या बडोद्याला स्थायिक झाल्या तर वडील सौदी अरेबियात कामाला होते. मालविकाच्या आईचे शिक्षण एसपी कॉलेजमधून झाले त्यामुळे आपल्या मुलीने देखील विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातूनच शिक्षण घ्यावे ही इच्छा होती. मुळे मालविका आपल्या कुटुंबासोबत पुण्यात दाखल झाली. पुण्यातील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची तिने पदवी प्राप्त केली. आपले शिक्षण झाल्यावर तिने आयटी कंपनीत काही काळ मोठया पगाराची नोकरी देखील पत्करली परंतु वडील पुण्यातील मार्केट यार्डमध्ये ट्रेडर असल्याने तिला शेतकऱ्यांच्या समस्येविषयी आस्था निर्माण झाली.

रोजच्या वर्तमानपत्रातील बातम्या वाचून तिला शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल जाणून घेता आले यातूनच सेंद्रिय शेती करण्याविषयी आवड निर्माण झाली. ‘द ऑरगॅनिक कार्बन’ या शेतीसंबंधीत संस्थेची तिने स्थापना केली आणि अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याबाबत जागरूक केले. यातूनच पुढे तिला मुळशी पॅटर्न चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. काही दिवसापूर्वीच मालविका गायकवाड ने आपल्या लग्नाचे प्रिवेडिंग शूट केले होते. Sid ki Malu असे म्हणत तिने हे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मालविकाने आपल्या लग्नाआधी बॅचलर पार्टी देखील साजरी केली होती. शिवाय मेहेंदी सेरेमनी आणि हळदीचे फोटो तिने शेअर केलेले पाहायला मिळत आहेत. मालविका हीने सिद्धार्थ सिंघवी या आपल्या मित्रासोबत काही दिवसांपूर्वीच लग्न केले आहे. नुकताच आपल्या लग्नाचा एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे अगदी राजेशाही थाटात हा दिमाखदार लग्न सोहळा पार पडला . मालविका आणि सिद्धार्थ या दोघांना आयुष्याच्या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

बऱ्याच कमी लोकांना हे माहित असेल कि मराठी चित्रपट मुळशी पॅटर्न मधील अभिनेत्री “मालविका गायकवाड” हि बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या आहे. मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटातून अभिनेत्री मालविका गायकवाड ने महत्वाची भूमिका बजावली होती. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना मालविका गायकवाड हिने साकारलेला हा पहिलाच मराठी चित्रपट आणि याच चित्रपटामुळे तिला अमाप प्रसिद्धी देखील मिळाली. मालविका ही बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या. पुणे हे तिच्या आईचे माहेर आणि आजोळ. लग्न होऊन त्या बडोद्याला स्थायिक झाल्या तर वडील सौदी अरेबियात कामाला होते. मालविकाच्या आईचे शिक्षण एसपी कॉलेजमधून झाले त्यामुळे आपल्या मुलीने देखील विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातूनच शिक्षण घ्यावे ही इच्छा होती. मुळे मालविका आपल्या कुटुंबासोबत पुण्यात दाखल झाली. पुण्यातील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची तिने पदवी प्राप्त केली. आपले शिक्षण झाल्यावर तिने आयटी कंपनीत काही काळ मोठया पगाराची नोकरी देखील पत्करली परंतु वडील पुण्यातील मार्केट यार्डमध्ये ट्रेडर असल्याने तिला शेतकऱ्यांच्या समस्येविषयी आस्था निर्माण झाली.

View this post on Instagram

To love, laughter and happily ever after.. #SidKiMalu #bigfatindianwedding #indianbride #red #happilyeverafter

A post shared by Malvika Gaekwad (@malvika_gaekwad) on

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *