..म्हणून माधुरी दीक्षितने घेतला होता अनिल कपूरसोबत ‘काम न’ करण्याचा निर्णय!!

..म्हणून माधुरी दीक्षितने घेतला होता अनिल कपूरसोबत ‘काम न’ करण्याचा निर्णय!!

90 च्या दशकातील सर्वात हिट जोडी म्हणजे माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची जोडी. दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तेजाब, बेटा, राम लखन, किशन कन्हैया, पुकार, हिफाजत, परिंदा, जमाई राजा, प्रतिकार सोबतच अनेक चित्रपटांमध्ये ही जोडी झळकली.

पण नंतर या दोघांमध्ये असे काही झाले की अचानकपणे माधुरीने अनिल कपूर सोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. आणि तिने हा निर्णय 18 वर्ष मोडून टोटल धमाल चित्रपटात तिने पुन्हा एकदा अनिल कपूर सोबत स्क्रिन शेअर केली.

90 च्या दशकातील अनिल मधुरीची जोडी प्रेक्षकांची सर्वात आवडती जोडी होती आणि दिग्दर्शक निर्माते यांची पहिली पसंती याच जोडीला असायची कारण अनिल आणि माधुरी ज्या चित्रपटात काम करायचे तो चित्रपट नक्कीच हिट व्हायचा. पण अचानक पणे असे काय झाले की माधुरीने अनिल कपूर सोबत काम न करण्याचा निर्णय घेतला!. चला जाणून घेऊया.

टोटल धमाल मध्ये काम करण्याआधी पुकार हा अनिल मधुरीचा अखेरचा सिनेमा होता. या चित्रपटानंतरच माधुरीने अनिलसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. पण का? आज याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

अनके चित्रपटात एकत्र काम करता करता अनिल आणि माधुरी यांची खूप चांगली मैत्री झाली होती. देघेही सेटवर सोबत असायचे आणि खूप गप्पा मारायचे त्यामुळे त्यांच्या अफयर्सच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चेला इतके उधाण आले होते की ही बातमी अनिल कपूरची सुनिताच्या कानापर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही.

अनिल व माधुरीच्या अफेअरच्या बातम्या सुनीता अस्वस्थ होती. एक दिवस सुनीता मुलांसोबत अनिलच्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचली. अनिल पत्नी व मुलांसोबत गप्पा मारण्यात रंगून गेलेत. नेमक्या त्याचक्षणी माधुरी तिथे पोहोचली. अनिल कपूरला कुटुंबासोबत पाहून तिला कळायचे ते कळले. होय, ही एक हॅपी फॅमिली आहे, हे माधुरीला कळले.

त्यानंतर माधुरीने म्हणे, अनिल कपूरपासून अंतर ठेवण्याचा आणि त्याच्यासोबत पुढे कुठल्याही सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतला.

अनिलच्या कुटुंबाला दु:ख होईल, असे मी काहीही करू इच्छित नाही, असे माधुरी एका मुलाखतीत म्हणाली होती. यानंतर माधुरीने अनिलसोबत काम करणे जवळजवळ बंद केले, दोघेही 2000 मध्ये राजकुमार संतोषींच्या ‘पुकार’ मध्ये अखेरचे झळकले होते. पुढे ही जोडी 2019 मध्ये ‘टोटल धमाल’मध्ये दिसली. पण तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *