मासिक पा’ळीसाठीच नवे तर पुरुषांनी आपली क्षमता वाढवण्यासाठी उन्हाळ्यात अशाप्रकारे खा ‘चिकू’….

मासिक पा’ळीसाठीच नवे तर पुरुषांनी आपली क्षमता वाढवण्यासाठी उन्हाळ्यात अशाप्रकारे खा ‘चिकू’….

तापमानात वाढ झाल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवायला लागला आहे. कडाक्याच्या उन्हापासून शरिराला थंडावा मिळावा म्हणून आहारात गारेगार काकडी, कलिंगड, संत्री, खरबूज आणि चिकूसारख्या फळांचा समावेश केला जातो. या सर्व फळांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे श’रीराला थंडावा मिळतो. आज आपण चिकू खाल्यास तुमच्या शरीरास आरोग्यदायी फायदे कोणते होतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

चिकूमध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद व आद्र्रता भरपूर प्रमाणात असतात. तसेच ‘अ’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणावर असते. तर अल्प प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व आणि नसगक फलशर्करा भरपूर प्रमाणात असते. चिकू मधीलया गुणधर्मामुळे थकलेल्या, दमलेल्या, अशक्त झालेल्या निरुत्साही व्यक्तीस चिकूचे सेवन हे अमृतासमान आहे.

चिकू खाण्याचे फायदे
बालकांना अभ्यास व खेळण्यामुळे शा’रीरिक व मा’नसि’क थकवा आल्यानंतर चिकू खायला दिल्याने त्यांच्यात नवा उत्साह व शक्ती संचारते. त्यामध्ये फलशर्करेचे प्रमाण अधिक असल्याने ती रक्तात मिसळून लगेचच थकवा घालवते.

1. चिकू हे मधुर, श्रमहारक, तृप्तीदायक, दाहनाशक असल्याने श्रम करून थकवा आलेल्यांनी चिकू खाल्ल्याने नवी ऊर्जा मिळते.
2. चिकू, शीतल व दाहशामक असल्याने अरुची, मळमळ आम्लपित्त, अतिसार या आ’जारांमध्ये उपयुक्त आहे.

3. चिकू खाल्ल्याने आतडय़ांची कार्यक्षमता वाढून व ती सुदृढ बनतात.
4. चिकूच्या झाडातून चिकल नावाचा डिक बाहेर निघतो तसेच त्याच्या सालीमधून चिकट दुधी रंगाचा रसचिकल नावाचा डिक काढण्यात येतो. वस्तू चिकटवण्यासह या डिकापासून च्युइंगमही बनवण्यात येते.

5. ग’र्भव’ती स्त्रीने सकाळी उठल्याबरोबर चूळ भरल्यानंतर रोज एक चिकू खावा. रात्रभर उपाशी राहिल्याने सकाळी येणारी चक्कर तसेच उलटी मळमळ ही लक्षणं चिकू खाल्ल्याने कमी होतात व फलशर्करा मिळाल्यामुळे उत्साह निर्माण होतो.
6. र’क्तदा’ब कमी असणाऱ्या व्यक्तींनी चिकू खाल्ल्यास र’क्तदाब’ प्राकृत होतो.

7. ज्यांना वारंवार चक्कर येण्याचा त्रा’स होत असेल तसेच श’रीरातील साखर वारंवार कमी होत असेल, लो शु’गरचा त्रा’स असणाऱ्या व्यक्तींनी चहा, बिस्किटं खाण्याऐवजी चिकू खावा. या चिकूमधील नसगक फलशर्करा लगेचच र’क्तात शो’षली जाते व चक्कर, थकवा, ग्लानी ही लक्षणे कमी होतात.

8. ता’प आलेल्या रु’ग्णांचं जर तोंड बेचव झालं असेल तर चिकू खावा. त्याने तोंडास रुची निर्माण होऊन उत्साह निर्माण होतो.
9. चिकूच्या सालीचा काढा अतिसार व ताप यामध्ये दिल्यास जुलाब व ताप ही लक्षणं कमी होतात. कारण चिक्कूच्या सालीमध्ये टॅनिन हा घटक असतो आणि हा घटक श’क्तिवर्धक व ता’पनाशक आहे.

10. चिकू ७-८ तास लोण्यामध्ये भिजवून खाल्ल्यास श’रीरामधील दाह, डोळ्यांची, हातपायांची जळजळ, आम्लपित्त ही पित्त’प्रकोपक लक्षणं कमी होतात.
11. चिक्कूमध्ये असणाऱ्या आद्र्रता व तंतुमय पदार्थामुळे मलावरोध असणाऱ्या रु’ग्णांनी रात्री झोपताना व सकाळी उठल्याबरोबर चिक्कू खाल्ल्यास शौचास साफ होते.

सावधानता काय बाळगाल

कच्चे चिक्कू खाऊ नयेत, कारण हे चिक्कू बेचव असतात व त्यामधील चिकामुळे तोंड कोरडे पडते तसेच मलावरोध व पोटात दुखणे या तक्रारी दिसून येतात. पिकलेला चिक्कू स्वच्छ धुऊन खावा. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी सहसा चिक्कू खाऊ नये.

Themaharashtrian

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *